काँग्रेसचे सरकार असतांना महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर, मोठे समाजकार्य करणारे रा.स्व. संघाचे संस्थापक पू. हेगडेवार आदींना भारतरत्न देण्याचा प्रयत्न का केला नाही ?, याचे उत्तर हरिश रावत देतील का ?
नवी देहली – काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिश रावत यांनी केली.
रावत पुढे म्हणाले की, तुम्ही या दोघींच्या राजकारणाशी सहमत असाला किंवा नसाल; सोनिया गांधी यांनी भारतीय महिलांचा सन्मान आणि सामाजिक समर्पण, तसेच लोकसेवेच्या मापदंडांना एक नवी उंची प्राप्त करून दिल्याचे कोणीही नाकारू शकत नाही. मायावती यांनी अनेक वर्षांपासून पीडित आणि शोषित लोकांच्या मनात एक अद्भुत विश्वास जागृत केला आहे. त्यामुळे सरकारने या दोघींचा यंदाच्या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करावा.
आदरणीय #सोनिया_गांधी जी व सम्मानित बहन #मायावती जी, दोनों प्रखर राजनैतिक व्यक्तित्व हैं। आप उनकी राजनीति से सहमत और असहमत हो सकते हैं, मगर इस तथ्य से आप इनकार नहीं कर सकते हैं कि सोनिया जी ने भारतीय महिला की गरिमा और सामाजिक समर्पण व जनसेवा के मापदंडों को एक नई ऊंचाई व pic.twitter.com/FaFfHOf355
— Harish Rawat (@harishrawatcmuk) January 5, 2021