हिंदु असल्याचे सांगत हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या मुसलमान तरुणाला अटक

एखाद्या मुलीवर प्रेम करण्यासाठी खोटे नाव आणि धर्म सांगण्याची आवश्यकता का भासते ? याचे उत्तर तथाकथित निधर्मीवादी देतील का ?

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथे रफीक खान हा मुसलमान तरुण स्वतःची खरी ओळख लपवून ‘रवि यादव’ असल्याचे सांगत एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी मंदिरात जाऊन विवाह करण्याचा प्रयत्न करत होता.

याची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यावर त्यांनी त्याच्याकडे ओळखपत्रांची मागणी केली. तेव्हा त्याचे आधारकार्ड बनावट असल्याचे लक्षात आले. त्यांनी रफीक याला पोलिसांच्या कह्यात दिल्यावर पोलिसांच्या चौकशीत त्याने त्याचे नाव रफीक खान असल्याचे मान्य केल्यावर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. रफीक राज्यातील होशंगाबाद येथील रहाणारा आहे. त्याने तो अनाथ असल्याची बतावणीही तरुणीच्या पालकांकडे केली होती.