
अमृत प्राप्त व्हावे म्हणून देवांनी समुद्राचे मंथन करण्याचे अवघड काम आरंभले. या मंथनातून कौस्तुभासारखी रत्ने निर्माण झाली; पण देव त्याच्या लोभात पडून थांबले नाहीत किंवा हलाहलासारखे भयंकर विष निर्माण झाले, तरी त्याच्या भीतीने त्यांनी मंथन करण्याचे सोडले नाही. अमृत प्राप्त होईपर्यंत त्यांनी सतत प्रयत्न केले. तसा धीरपुरुष आपल्या निश्चयापासून कधी ढळत नाही.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘जीवनसाधना’ ग्रंथ )