देवा, तू काय काढलेस जीवनदर्शन ।

गुरुकृपायोगाची निर्मिती करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

मी सकाळी नामजपाला बसले. हळूहळू मला आध्यात्मिक त्रास होऊ लागला. तेव्हा मनात विचार आला, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ हातात घेऊन चालत नामजप करूया; परंतु माझी तो ग्रंथ हातात घ्यायची इच्छाच होईना. त्याविषयी चार ओळी सुचल्या, त्या गुरुदेव तुमच्या चरणी अर्पण करते.

(साधिकेला आध्यात्मिक त्रास असल्याने तिला हा चैतन्यमय ग्रंथ हातात घेतल्याने त्रास जाणवतो. या वेळी तिला जाणवलेली सूत्रे तिने काव्यात मांडली आहेत. – संकलक)

सौ. मंगल खटावकर

देवा, तू काय काढलेस जीवनदर्शन ।
पहाताच त्रास होई आमच्या मना ।
काय वर्णू दर्शनाची आभा । होई त्रास आम्हा ॥ १ ॥

नाथा, तुझे किती गुण वर्णावे तेवढे थोडेच ।
अजुनी कळेना साधका ।
तुझी कीर्ती ओळखली आम्ही ।
देवा, तू काय काढलेस जीवनदर्शन ।
पहाताच होई त्रास आम्हा ॥ २ ॥

स्वभावदोषातूनी पडेना बाहेर ।
कर्तेपणा असे अजुनी, असे अंगी मीपणा ।
नाथा, तुझ्या चैतन्याने भरले जीवनदर्शन ।
पहाताच होई त्रास आम्हा ॥ ३ ॥

मिळे चैतन्य त्यातून, त्याचे कळेना महत्त्व कुणा ।
आम्हास घेऊनी बसावे वाटते ।
पण भिऊनी थरथरे अंग अन् कंप होई मना ।
देवा, तू काय काढलेस जीवनदर्शन ।
पहाताच होई त्रास आम्हा ॥ ४ ॥

होई निर्मूलन वाईट शक्तींचे ।
येईल ध्वज श्रीरामाचा ।
वैकुंठ राज्य स्थापेल भूवरी ।
कीर्ती तुझी पसरेल भूवरी ॥ ५ ॥

देवा, तुला शरण येऊनी आम्ही ।
तुझा आशीर्वाद घेऊनी जातो ।
धन्य धन्य ती जीवनगाथा ।
त्रिवार माझा नमस्कार नाथा ॥ ६ ॥

– सौ. मंगल परशुराम खटावकर, मिरज (२२.८.२०१८)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक