अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि अंबिका योग कुटीर यांच्याकडून विनामूल्य ‘ऑनलाईन’ योगप्रशिक्षण !

कोरोनाच्या काळात विनामूल्य योग प्रशिक्षण देणार्‍या संघटनांचा स्तुत्य उपक्रम

मुंबई, १९ डिसेंबर (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून चालू असलेल्या ‘फिट है इंडिया’ या मोहिमेच्या अंतर्गत अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि अंबिका योग कुटीर यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘ऑनलाईन’ योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण समाजातील सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.

कोरोनाच्या विषाणूला सक्षमपणे प्रतिकार करण्याच्या हेतूने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी २५ डिसेंबरपर्यंत महासंघाच्या पदाधिकार्‍यांकडे नाव नोंदणी करावी’, असे आवाहन अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी गणेश गुरव (भ्र.क्र. ९००४६०९४०१ ), हरिश्‍चंद्र अहिर (भ्र.क्र. ८४५४०८४८४४ ), रत्नाकर वजराटकर (भ्र.क्र. ८६५२६७८६५२), सौ. सुषमा बेर्डे (भ्र.क्र. ९८२०७६३४५३) या महासंघाच्या पदाधिकार्‍यांकडे नावनोंदणी करता येणार आहे. यामध्ये योगशास्त्रातील ‘नेती’ आणि ‘नेती पूर्वसिद्धता’ आदी योगप्रकार शिकवले जाणार आहेत.