जळगाव – ३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाळधी येथील पोलिसांना, तर धरणगाव येथील पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. ३१ डिसेंबरच्या रात्री विविध अयोग्य कृती केल्या जातात. त्यातून कायदा-सुव्यवस्था बिघडते. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन यांवर त्याचा अतिरिक्त ताण येतो. यासाठी हे अपप्रकार रोखायला हवेत, असे या निवेदनात म्हटले आहे.
धरणगाव येथील निवेदन पोलीस निरीक्षक जयपाल धीरे आणि तहसीलदार सचिनकुमार देवरे यांनी, तर पाळधी येथील निवेदन पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी स्वीकारले. या वेळी समितीचे कार्यकर्ते सर्वश्री सुभाष पाटील, प्रल्हाद सोनवणे, विनोद शिंदे, महेंद्र चौधरी, योगेश सोनवणे, पंकज बागुल, मनोहर दहिवदकर आणि मच्छिंद्रनाथ उपस्थित होते.
हॉटेल आणि बार मालक यांना जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार आम्ही १४९ ची नोटीस बजावून नियमाचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई करू. – हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, पाळधी, ता. धरणगाव |