पू. अशोक पात्रीकर यांना यज्ञाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कपाळावर दैवी चिन्हे दिसणे !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
पू. अशोक पात्रीकर

‘सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या ‘नारायण होमाच्या’ वेळी मला यज्ञस्थळी असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कपाळावर बेलपत्राप्रमाणे आकृती दिसली. सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या ‘श्री बगलामुखी यागाच्या’ वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कपाळावर तुळशीपत्राप्रमाणे आकृती दिसली. ‘बेलपत्र आणि तुळशीपत्र या आकृत्या दैवी असून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवीस्वरूप असल्याची साक्ष मिळाली’, असे मला जाणवले. या दैवी साक्ष दिल्याविषयी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञ आहे.’

– (पू.) अशोक पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक