या रामराया मम अंतरी ! 

श्रीराम

स्नाने शुचिर्भूत काया झाली ।
सडा शिंपिता जशी धरा उजळली ।।
मन पाखरू गाते भावोद्दीपित गान ।
या रामराया मम अंतरी ।। १ ।।

सौ. प्राजक्‍ता पुजार

गुढ्या तोरणे स्वागता दारी ।
गुरुकृपेचीच ही आभूषणे सारी ।।
शरणागत चित्त रहाते नामात ।
या रामराया मम अंतरी ।। २ ।।

षड्रिपू भंजन करण्या या हो ।
अहं दूर सारण्या या हो ।
परम सुखाचे अद्वैताचे दान द्या हो ।
या रामराया मम अंतरी ।। ३ ।।

– सौ. प्राजक्ता पुजार, फोंडा, गोवा. (२.१०.२०२४)


श्रीराम म्हणा, तुम्ही श्रीराम म्हणा ।

श्रीराम म्हणा, तुम्ही श्रीराम म्हणा ।
श्रीराम म्हणा, तुम्ही श्रीराम म्हणा ।। धृ ।।

श्रीमती प्रमोदिनी शेटे

कोमल हृदयी श्रीराम, तुम्ही श्रीराम म्हणा ।
भक्त संकटहारण श्रीराम, तुम्ही श्रीराम म्हणा ।।१।।

करुणावतार श्रीराम, तुम्ही श्रीराम म्हणा ।
दास शरणागता श्रीराम, तुम्ही श्रीराम म्हणा ।। २ ।।

अज्ञाननाशक श्रीराम, तुम्ही श्रीराम म्हणा ।
ज्ञानसूर्य श्रीराम, तुम्ही श्रीराम म्हणा ।। ३ ।।

श्रीराम म्हणा, तुम्ही श्रीराम म्हणा ।
श्रीराम म्हणा, तुम्ही श्रीराम म्हणा ।।

– श्रीमती प्रमोदिनी प्रमोद शेटे, कोल्हापूर (१५.३.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक