बेंगळुरूमध्ये २ मशिदींवरील ध्वनीक्षेपकांद्वारे होणारे ध्वनीप्रदूषण थांबवण्यास हिंदु विधीज्ञ परिषदेच्या प्रयत्नांना यश

ध्वनीप्रदूषण करणार्‍या अशा ध्वनीक्षेपकांवर सरकारने स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !

बेंगळुरू – येथील मल्लेश्‍वरम् भागात हिंदु विधीज्ञ परिषद आणि काही अधिवक्ते यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे येथील २ मशिदींवरून होणारे ध्वनीप्रदूषण रोखण्यास यश मिळाले आहे.

१. मल्लेश्‍वरम् येथे अधिवक्ता संघटनेचे कार्यालय आहे. तेथून १ किलोमीटर अंतरावर २ मशिदी आहेत. या मशिदीवरील ध्वनीक्षेपकावरून पहाटे ५.३० ते रात्री ८.३० या वेळेत ५ वेळा अजान दिली जात असल्यामुळे ध्वनीप्रदूषण होत होते.

२. ध्वनीक्षेपकावरून येणार्‍या आवाजामुळे वृद्ध नागरिक आणि वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त रुग्णांना सतत मानसिक त्रास होत होता. या आवाजामुळे विद्यार्थ्यांना असह्य त्रासदेखील होत होता. एक शासकीय प्राथमिक शाळा आणि के.सी. जनरल रुग्णालय मशिदींजवळच आहे अन् मशिदींमुळे होणार्‍या आवाजाचा शेकडो विद्यार्थी आणि रुग्णांवर परिणाम होत होता.

३. या मशिदींना प्रतिदिन ध्वनीक्षेपक वापरण्यास अनुमती देण्यात आली आहे कि नाही, याची माहिती मिळण्यासाठी अधिवक्त्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत पोलीस ठाण्यात अर्ज केला होता.

४. पोलिसांनी २ ऑक्टोबर २०२० या दिवशी उत्तर दिले की, पोलीस ठाण्याकडे यासंबंधी कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत, तसेच मशिदींमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाविषयी लोकांकडून कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.

५. या काळात या संदर्भात प्रयत्न करणारे अधिवक्ता जी.एम्. नटराज यांना काही कारणास्तव त्यांच्या गावी जावे लागले. जेव्हा ते परत आले, तेव्हा त्यांना मशिदीवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज थांबलेला दिसला. माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या अर्जाच्या आधारे पोलीस सक्रीय झाले आणि त्यांनी ध्वनीक्षेपकांचा वापर थांबवला, हे लक्षात आले.

मशिदींमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात तक्रार करण्यास घाबरणारे हिंदू !

अधिवक्त्यांनी ‘कर्नाटक पोलीस कायदा १९६३’चे कलम ३७ आणि १०९ अन्वये लोकहितासाठी तक्रार करायचे ठरवले. कर्नाटकच्या उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करण्याचीही त्यांची सिद्धता होती. त्या संदर्भात त्यांनी अनेकांना आणि हिंदु संघटनांनाही साहाय्यासाठी विनंती केली; परंतु यांपैकी बहुतेकांनी ‘धर्मांध एकत्रित होऊन त्यांच्या घरावर दगडफेक करतील’, अशी भीती व्यक्त केली.

(असे घाबरट हिंदू कधीतरी ध्वनीप्रदूषण रोखू शकतील का ? यावरून प्रभावी हिंदूसंघटनाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! – संपादक)