सध्या भारतात बहुतांश राज्यांमध्ये हिंदुत्वनिष्ठ म्हणवणारी राज्य सरकारे आहेत. कोणतेही राज्य सरकार स्थापन करण्याआधी ‘हिंदुत्वाला महत्त्व देऊ’, असे सांगत किंवा ‘हिंदुहिताचे कार्य करू’ असे आश्वासन दिले जाते. पुढे हिंदुत्वासाठी सरकार स्थापन करण्यात येते; पण सरकार आल्यानंतर खरेच हिंदुत्वाला महत्त्व मिळते का ? हिंदूंवरचे अन्याय थांबतात का ? हिंदूंना आपापल्या क्षेत्रात सुरक्षित वाटते का ?
हिंदू सरकार निवडून देतात; पण प्रत्यक्ष परिस्थितीत सरकारी यंत्रणा, न्यायव्यवस्था हिंदूंच्या बाजूने विचार वा कृती करते का ? सरकार हिंदुत्वनिष्ठ विचारांचे असूनही हिंदूंसाठी चांगले दिवस आले आहेत का ? हे प्रश्न आताच्या सजग हिंदूंना पडणे आवश्यक आहे. हिंदू अजून किती दिवस असा अन्याय सहन करणार आहेत ?

१. जिहादी आणि धर्मांतर यांचे वाढते जाळे अन् महिला सुरक्षेचा ऐरणीवर आलेला प्रश्न
नुकतेच नाशिकमध्ये ‘टी.सी.एस्.’ आस्थापनातील ‘कार्पोरेट (व्यावसायिक)’ जिहादचे प्रकरण समोर आले. कार्यालयात काम करणार्या हिंदूंवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यानंतर अमरावतीमध्ये एका धर्मांध तरुणाने १८० मुलींचे चुकीच्या प्रकारे व्हिडिओ बनवून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. अकोल्यात ‘परीबिंदीघर’च्या नावाखाली दुकानातील सौंदर्यप्रसाधने घेण्यासाठी ‘व्हॉट्सॲप ग्रुप’ सिद्ध करण्यात आला आणि त्या माध्यमातून महिलांना फसवण्यात आले. हे सगळे प्रकार गेल्या २ मासांतील आहेत. या प्रकरणातील आरोपींना जरी अन्वेषण यंत्रणांनी कह्यात घेतले असले, तरी संबंधित आरोपी, आस्थापन आणि षड्यंत्र रचणारे मुख्य सूत्रधार यांना अद्यापपर्यंत कोणतीही कठोर शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. यामुळे असा प्रश्न नक्की पडतो की, अजून अशा किती हिंदु मुली आणि महिला षड्यंत्राला फसणार आहेत ? आणि प्रशासन केव्हा कठोर वचक निर्माण करणार आहे. खरेतर या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ धर्मांतरविरोधी कायद्यावर स्वाक्षरी करायला हवी आणि त्याची प्रभावी कार्यवाही करण्यास सांगायला हवे, अशी समस्त हिंदूंची मागणी आहे.
२. हिंदु स्त्रियांनी स्वतःतील आदिशक्तीचे स्वरूप ओळखण्याची आवश्यकता !

ज्या प्रकारे त्रेतायुगात सीतामाता लंकेत असतांना एकही बलाढ्य राक्षस आणि स्वतः रावण त्यांना स्पर्श करू शकला नाही. याचे कारण, म्हणजे त्यांनी त्यांच्यातील स्वत्व (म्हणजे आदिशक्ती रूप) जागृत केले होते. म्हणून त्यांचा आदर्श घेऊन आज प्रत्येक स्त्रीने स्वतःतील आदिशक्तीचे स्वरूप ओळखायला हवे, तर आणि तरच लव्ह जिहाद अन् धर्मांतर यांसारखे अपप्रकार नक्कीच थांबतील.
३. काश्मिरी हिंदू स्वगृही कधी परतणार ?
काश्मीर हे भारताचे अविभाज्य आणि घटनात्मक अंग आहे. तेथील हिंदू म्हणजे केवळ इतिहास नाही, तर राष्ट्राचा आत्मा आहे. जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून ६ वर्षे झाली; पण काश्मिरी हिंदूंची सन्मानाने स्वगृहवापसी अजूनही पूर्ण झालेली नाही. वर्ष १९९० मध्ये साडेचार लाख काश्मिरी हिंदूंना आतंकवाद्यांच्या धमक्या, हत्या आणि अत्याचार यांमुळे स्वतःची भूमी सोडावी लागली. ज्या भूमीत शतकानुशतके हिंदु संस्कृती फुलली, त्या भूमीतच हिंदूंना निर्वासित जीवन जगावे लागत आहे. कलम ३७० हटवतांना हिंदूंना आशा होती की, ‘आता काश्मीरमध्ये हिंदू पुन्हा सुरक्षितपणे स्थायिक होतील’; पण प्रत्यक्षात सरकारी यंत्रणांची गती अत्यंत संथ आहे. केवळ घोषणा करून प्रश्न सुटत नाही, तर हिंदूंना सुरक्षित वसाहती, प्रभावी सुरक्षा आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण होईल, अशी व्यवस्था मिळणे आवश्यक आहे. आजही अनेक काश्मिरी हिंदु निर्वासितांच्या छावण्यांमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये संघर्षमय जीवन जगत आहेत. त्यांच्या मंदिरांची आणि घरांची अवस्था दयनीय आहे. त्यांच्या भूमी धर्मांधांनी लाटल्या आहेत. काश्मिरी हिंदूंना त्यांचे सर्वस्व परत मिळण्यासाठी सरकारने केवळ राजकीय लाभ न पहाता त्यांच्या न्यायासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. काश्मिरी हिंदूंना त्यांच्या मातृभूमीत पुन्हा सन्मानाने स्थायिक करणे, हे सरकारचे कर्तव्य आहे, अन्यथा ‘न्याय’ हा शब्द केवळ भाषणांपुरताच मर्यादित राहील.
४. हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक : हिंदूबहुल राज्यात हिंदूच असुरक्षित !

१० मे २०२६ या दिवशी राजस्थानमध्ये हिंदूंच्या एका भव्य मिरवणुकीवर काही धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केली आणि संपूर्ण हिंदु समाजामध्ये संतापाची लाट उसळली. भगवे झेंडे, ढोल-ताशे आणि महाराणा प्रताप यांच्या जयघोषांनी वातावरण भारलेले असतांना अचानक झालेल्या दगडफेकीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. विशेष म्हणजे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात असतांनाही ही घटना घडली. त्यामुळे आज सामान्य हिंदूंच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे, ‘हिंदुत्वनिष्ठ म्हणवणारे सरकार असतांनाही हिंदू स्वतःच्या धार्मिक मिरवणुकांमध्ये सुरक्षित का नाहीत ?’
महाराणा प्रताप हे हिंदु स्वाभिमान, शौर्य आणि धर्मरक्षण यांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या जयंतीच्या दिवशीच हिंदूंवर दगडफेक होणे, हे केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून हिंदूंच्या अस्मितेला दिलेले उघड आव्हान आहे, असे म्हटल्यास चुकीचे ते काय ? जर पोलीस उपस्थित असतांनाही धर्मांधांचे एवढे धाडस होते, तर प्रशासनाचा धाक नेमका कुठे आहे ? सरकार हिंदुत्वाच्या घोषणा करते आणि पोलीस प्रशासन निधर्मीपणाने हिंदूंवर वार होत असतांना बघत असेल, तर हिंदूंनी कुणावर विश्वास ठेवायचा ?
५. हिंदुत्वाला पुनर्जीवित करायची, हीच ती वेळ !
हिंदूंना जी सर्वधर्मसमभाव आणि ‘सेक्युलर’वादाची (निधर्मीपणाची) गांधी माशी चावली आहे, त्याच्यासाठी औषध म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘राजकारणाचे हिंदुत्वकरण झाले पाहिजे’, तरच या देशांमध्ये हिंदूंना खर्या अर्थाने न्याय मिळू शकतो. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी युगधर्म ओळखून वेळीच भवानी तलवार हातात घेतल्यामुळे आज आपण ‘हिंदु’ म्हणून ताठ मानेने जगत आहोत. त्याच हिंदुत्वाचा पुन्हा एकदा जागर करून सर्वांनी देव, देश आणि धर्म यांसाठी एकत्र येऊन संघटित होऊया !
हिंदुत्व जोपासा ! हिंदु राष्ट्र घडवूया !
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– श्री. पार्थ सुनील घनवट, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘नशामुक्त’ राज्य ?
छत्रपती शिवराय आणि शुद्धीकरण मोहीम, म्हणजेच घरवापसी !
कर्नाटकातील गृहमंत्री तथा काँग्रेसचे प्रियंक खरगे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका, म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व सांगणारी एक बोधप्रद कथा !