घुसखोरांना मायदेशी पाठवण्याच्या भारताच्या मोहिमेला बांगलादेशाचा विरोध !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही कधीही तडजोड केली नाही अन् करणार नाही. लोकांना बलपूर्वक परत पाठवण्याला आम्ही विरोध करू, अशी चेतावणी ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरतावादी संघटनेचे साहाय्यक सरचिटणीस हमीदुर रहमान आझाद यांनी भारताच्या बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्याच्या दिली. ११ इस्लामी पक्षांना हाताशी धरून जमात-ए-इस्लामी देशव्यापी निदर्शने करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Hypocrisy much?
Jamaat-e-Islami talks about protecting Bangladesh’s sovereignty while protesting India's right to deport illegal immigrants.
For seven decades, India's sovereignty has been compromised.
India is determined to deport every illegal migrant. Deal with it.… pic.twitter.com/XtponViFAC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 13, 2026
आझाद पुढे म्हणाले की, लोकांना बलपूर्वक परत पाठवण्याचे प्रकार रोखण्यासाठी ‘बॉर्डर गार्ड बांगलादेश’ अधिक बळकट केले पाहिजे. सीमावर्ती भागातील लोकांनी मानवी साखळी सिद्ध केली पाहिजे, जेणेकरून आतंकवादी, तस्कर किंवा गुन्हेगार बांगलादेशात प्रवेश करू शकणार नाहीत.
आझाद यांनी दावा केला की, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत सीमेवरील ५० हून अधिक ठिकाणांवरून २ सहस्र ४७९ लोकांना बांगलादेशात बलपूर्वक ढकलण्याचा प्रयत्न झाला. फेब्रुवारीपासून आतापर्यंत भारताच्या ‘सीमा सुरक्षा दला’च्या गोळीबारात १९ बांगलादेशी नागरिक मारले गेले.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
Baglamukhi Mandir Online Fraud : मध्यप्रदेशातील माँ बगलामुखी मंदिरात हवन आणि पूजा करण्याच्या नावाखाली भाविकांची ऑनलाईन फसवणूक
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman