‘लव्ह जिहाद’ ते ‘कॉर्पोरेट जिहाद’ : सत्य जाणून घेण्यासाठी रत्नागिरीत १४ जूनला ‘विशेष कार्यक्रम’ !

रत्नागिरी – चिपळूण, लांजा तालुक्यांतील ग्रामीण भागांपासून ते शहरे – महानगरे यांपर्यंत दिसणारा ‘लव्ह जिहाद’ आता ‘हायटेक’ होऊन आयटी आस्थापने आणि राष्ट्रीयीकृत बँकांसारख्या उच्चभ्रू कॉर्पोरेट क्षेत्रात पोचला आहे. नाशिकमधील ‘टी.सी.एस’., मुंबईतील ‘एस्.बी.आय.’ बँक आणि पुण्याच्या ‘विप्रो’ आस्थापनात नुकतेच उघडकीस आलेले हिंदु महिलांचे धार्मिक छळ आणि बळजोरीने धर्मांतराचे प्रयत्न हे एका मोठ्या देशव्यापी संकटाचे संकेत आहेत. या ‘कॉर्पोरेट जिहाद’चे नेमके सत्य काय ?, हे समाजासमोर आणण्यासाठी रविवार, १४ जून २०२६ या दिवशी दुपारी ४ ते सायं. ६:३० या वेळेत ‘जयेश मंगल पार्क’, थिबा पॅलेस रोड, माळनाका, रत्नागिरी येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. गोविंद भारद्वाज यांनी दिली.
‘लव्ह जिहाद’चे नवे हायटेक स्वरूप आणि भीषणता याविषयी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की, संस्थात्मक छळ (Institutional Pressure) हा केवळ वैयक्तिक प्रेमाचा विषय नसून बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्ये उच्च पदांवर बसलेल्या विशिष्ट मानसिकतेच्या अधिकार्यांकडून आणि मुसलमान महिला सहकार्यांकडून हिंदु महिलांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी, नोकरीवरून काढण्याची धमकी देऊन पद्धतशीरपणे मानसिक दबाव आणला जात आहे. सध्या समोर आलेली काही प्रकरणे ही केवळ हिमनगाचे टोक असून कॉर्पोरेट क्षेत्रातील हिंदु महिलांच्या सुरक्षेचा आणि आस्थापनांच्या अंतर्गत व्यवस्थापनाचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.
आजच्या पत्रकार परिषदेला भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे, उपजिल्हाध्यक्ष श्री. संदीप नाचणकर, शहराध्यक्ष श्री. परशुराम तथा दादा ढेकणे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष श्री. गणेश गायकवाड, श्री हनुमान मंदिर, कोकण नगरचे विश्वस्त श्री. किशोर भुते उपस्थित होते.
मुख्य वक्ते आणि मार्गदर्शन :या देशव्यापी षड्यंत्राचे बिंग फोडण्यासाठी आणि नोकरदार भगिनींच्या रक्षणासाठी पुढील पत्त्यावर मान्यवर या विशेष संवादात अनेक धक्कादायक गोष्टी उघड करणार आहेत : १. श्री. रमेश शिंदे (राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती), २. सद्गुरु स्वाती खाडये (सनातन संस्था) आणि ३. अधिवक्त्या (सौ.) प्रीती राऊत (हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्या) हा विषय संपूर्ण हिंदु समाजाच्या सुरक्षिततेशी जोडलेला असल्याने रत्नागिरीतील सर्व नागरिक, महिला आणि युवक यांनी या संवादाला अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन समितीने केले आहे. अन्यायग्रस्त महिलांनी साहाय्यासाठी ७७३८२३३३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा. |
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांकडून स्वागत !
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम
सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ