हिंदु विधीज्ञ परिषदेच्या तक्रारीवरून राज्य महिला आयोगाचे पोलीस आयुक्तांना निर्देश !
पोलिसांकडून ९ पैकी एकाही गुन्ह्यात धर्मांतरविरोधी कायद्याचा वापर नाही !

मुंबई, ९ जून (वार्ता.) – नाशिक येथील टी.सी.एस्. आस्थापनामध्ये हिंदु महिलांना लव्ह जिहादमध्ये फसवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. असे असूनही आरोपींवर धर्मांतराचा गुन्हा नोंदवण्याऐवजी केवळ धार्मिक भावना दुखावणे आणि विनयभंग असे गुन्हे नोंदवण्यात आले. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी २० एप्रिल या दिवशी राज्य महिला आयोगाला पत्र पाठवून या अन्वेषणाविषयी संशय व्यक्त केला होता.
🚨 Religious Conversions at TCS Nashik Under Scanner
Acting on a complaint filed by Advocate @ssvirendra President, Hindu Vidhidnya Parishad, the Maharashtra State Women's Commission (@Maha_MahilaAyog) has directed Nashik Police to investigate allegations of religious… https://t.co/jGgOyRCVkI pic.twitter.com/u4vB7Qhru0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 10, 2026
परिषदेच्या पत्राची नोंद घेऊन ‘या प्रकरणातील धर्मांतराच्या दृष्टीने अन्वेषण करून चौकशी अहवाल सादर करावा’, असे निर्देश आयोगाने नाशिकच्या पोलीस आयुक्तांना दिले.
| राज्य महिला आयोगाने नाशिक येथील पोलीस आयुक्तांना दिलेला आदेश –
|

१. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या पत्रावरून आयोगाने २३ एप्रिल या दिवशी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना याविषयी पत्र पाठवले. पत्राची प्रत माहितीसाठी आयोगाने अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना पाठवली. ‘परिषदेने पत्रामध्ये व्यक्त केलेल्या संशयावरून हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामुळे पत्रातील सूत्रांनुसार अन्वेषण करावे’, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
२. महाराष्ट्र सरकारने १४ मार्च २०२६ या दिवशी धर्मांतरविरोधी कायदा संमत केला; परंतु ‘टी.सी.एस्.’मधील प्रकरणात नोंदवलेल्या ९ पैकी एकाही गुन्ह्यात या कायद्याचा वापर केला गेला नाही. पीडित महिलेच्या माहितीनुसार तिच्या धर्मांतरासाठीचे प्रयत्न स्पष्ट दिसत असूनही गुन्हा नोंदवतांना हे जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे का ?, असा संशय अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रामध्ये व्यक्त केला.
३. ‘योग्य कलमे न लावण्यामुळे आरोपींना पळवाटा मिळत आहेत’, असे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवली आहे.
CBI Arrests Pradeep Kumar : हरियाणा : निवृत्तीच्या काही घंटे आधीच आय.ए.एस्. अधिकार्याला ‘सीबीआय’ कडून अटक !
गाय हिंदूंसाठी पवित्र : तिच्या हत्येमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात ! : Gujarat High Court
स्थापनेनंतर १० वर्षांनी ‘महाआयटी’ने विधीमंडळात सादर केला पहिला वार्षिक अहवाल !
Sabarimala Gold Probe : शबरीमला सोने प्रकरणात ‘त्रावणकोर देवस्वम बोर्डा’च्या माजी अध्यक्षांच्या विरोधात मिळाले पुरावे !
ठाणे येथे शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणार्या २ खासगी व्यक्ती कह्यात !
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री