‘२८.३.२०२६ या दिवशी सौ. रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांची मुलगी आणि सून यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. सौ. गौरी कामत (कै. (सौ.) रंजना सिनारी, यांची मुलगी), मडगाव, गोवा.

१ अ. साधना आणि सेवा : ‘वर्ष १९९८ मध्ये माझी आई सनातन संस्थेच्या संपर्कात आली. आईमुळे मी आणि माझा भाऊ (आताचे कै. समीर सिनारी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. आईने बाबांचे (तिच्या यजमानांचे) ‘समीरने पूर्णवेळ साधना करावी’, यासाठी प्रबोधन केले. त्यानंतर बाबा हळूहळू समीरने साधना करण्याच्या संदर्भात सकारात्मक झाले होते. आई नामस्मरण करत असे. काही साधक सेवा झाल्यावर आईच्या घरी येत असत. तेव्हा आई त्यांना जेवण वाढत असे. आई कधी कधी नामदिंडीला जात होती.
१ आ. अनेक शारीरिक त्रास असूनही चेहर्यावर तसे न जाणवणे : माझ्या आईला ५५ व्या वर्षांपासून कंबरदुखीचा त्रास होता, तसेच तिला २५ वर्षांपासून मूत्रपिंड आणि हृदय यांच्याशी संबंधित त्रास होत होते. २८.२.२०२६ या दिवशी आईला रुग्णालयात भरती केले होते. ती रुग्णालयात १ मास होती. आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘त्यांच्यावर औषधांचा परिणाम होत नाही. मी अनेक रुग्ण पाहिले आहेत; मात्र इतका त्रास असलेला रुग्ण मी प्रथमच पाहिला.’’ आईला दिवसा आणि रात्रीही झोप येत नव्हती. ती रात्रभर शरीर खाजवत असे. तिला अनेक शारीरिक त्रास होत होते; पण तिच्या चेहर्यावरून तसे जाणवत नव्हते.
‘शांत, सोशिक स्वभाव आणि देवाच्या अनुसंधानात’

‘दिवंगत सौ. रंजना सिनारी सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना साधना करण्याचे महत्त्व समजले. ‘स्वतःच्या मुलाला साधना करता यावी’, यासाठी त्यांनी त्यांच्या यजमानांचे मन वळवले. त्यांना अनेक शारीरिक त्रास होत असूनही त्या जमेल तशी सेवा करत होत्या. त्यांच्या अखेरच्या काळात त्यांना अतिशय त्रास होत असतांनाही त्यांच्या चेहर्यावर तसे जाणवत नव्हते. त्या सतत नामस्मरण करत असत. त्यामुळेच त्यांना तीव्र वेदना होत असतांनाही त्यांचे नामस्मरण चालू होते. त्या रुग्णालयात असतांना त्यांच्यावर उपचार करणार्या आधुनिक वैद्यांप्रती त्यांना कृतज्ञता वाटत होती. ‘शांत, सोशिक स्वभाव आणि देवाच्या अनुसंधानात असणे’, या गुणांमुळे त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (४.५.२०२६)
१ इ. गुरूंप्रती भाव : आई रुग्णालयात असतांना गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) धावा आणि स्मरण करत होती. तिच्यावर उपचार करण्यासाठी आलेल्या आधुनिक वैद्यांमध्येही तिला गुरुदेवांचे सूक्ष्मातून दर्शन होत होते. एकदा आईने आधुनिक वैद्यांना हात जोडले. तेव्हा तिच्या डोळ्यांमध्ये भावाश्रू होते. तेव्हा आधुनिक वैद्य आईला म्हणाले, ‘‘तुम्ही मला कशाला हात जोडता.’
१ ई. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. आईच्या निधनानंतर तिचा चेहरा पिवळा आणि हसरा दिसत होता. तिच्या चेहर्यातील हा पालट आमच्या साधना न करणार्या नातेवाइकांनाही जाणवला. सर्वांनी याविषयी आश्चर्य व्यक्त केले.’
२. श्रीमती वैष्णवी समीर सिनारी (कै. (सौ.) रंजना सिनारी यांची सून), शिरसई, तालुका बार्देश, गोवा.
अ. ‘माझ्या सासूबाईंना रुग्णालयात भरती केल्यावर मी त्यांच्या समवेत रहात होते. मी त्यांच्यासाठी काही अन्नपदार्थ बनवून आणत होते. एकदा मी त्यांना विचारले, ‘‘कोणते मासे बनवून आणू ?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मला मासे नको. मी मासे खाणार नाही. मला गुरुदेवांच्या जवळ जायचे आहे.’’
आ. मी रात्रीच्या वेळी त्यांच्या समवेत असतांना ‘त्यांना नामजप करण्याची आठवण करून देणे, प्रार्थना करायला सांगणे आणि भ्रमणभाषवर नामजप लावून ठेवणे’, असे करत होते.’
(लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक : १७.४.२०२६)
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद