गेल्या दशकभरात २५ पटींनी वाढली निर्यात !
शस्त्रांची निर्यात विक्रमी ३८ सहस्र ४२४ कोटी रुपयांपर्यंत पोचली !
नवी देहली – संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०२५-२६ मध्ये भारताची संरक्षण निर्यात विक्रमी ३८ सहस्र ४२४ कोटी रुपयांपर्यंत पोचली, जी मागील वर्षाच्या तुलनेत ६२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ब्रह्मोससाठी फिलिपाइन्स, व्हिएतनाम आणि इतर दोन देशांकडून अनुमाने १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे करार झाले आहेत. भारत आता १०० हून अधिक देशांना संरक्षण उपकरणे निर्यात करतो, ज्यामध्ये अमेरिका, फ्रान्स आणि आर्मेनिया प्रमुख आहेत.
🚀 India's defence exports are now reaching over 100 countries worldwide!
📈 Exports have grown 25-fold in the last decade, touching a record ₹38,424 crore.
🇮🇳 The successful deployment of BrahMos and Akash during Operation Sindoor has significantly boosted global demand.… pic.twitter.com/rJQDff7iQp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 1, 2026
१. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ‘ब्रह्मोस’, ‘आकाश’ यांसारख्या भारतीय शस्त्रांच्या वापरामुळे त्यांची जागतिक मागणी वेगाने वाढली आहे. अनेक देशांनी ती खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे, तर काहींसमवेत सहस्रो कोटी रुपयांचे करारही झाले आहेत.
२. इंडोनेशियासमवेत अनुमाने ३ सहस्र ६०० कोटी रुपयांचा करार अंतिम संमतीच्या टप्प्यात आहे. ‘आकाश क्षेपणास्त्र प्रणाली’साठी आर्मेनियाकडून ६ सहस्र १०० कोटी रुपयांचा करार आधीच झाला आहे.
३. भारतीय शस्त्रांचा अमेरिका सर्वांत मोठा खरेदीदार आहे. २८० कोटी डॉलर (२६ सहस्र ८८० कोटी रुपये) किमतीच्या प्रणाली आणि सुटे भाग भारतातून ‘बोईंग’ अन् ‘लॉकहीड मार्टिन’ यांसारख्या मोठ्या आस्थापनांना जातात.
४. सरकारने २०२९-३० पर्यंत ५० सहस्र कोटी रुपयांचे संरक्षण निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. वर्ष २०१६-१७ मध्ये हे केवळ १ सहस्र ५२२ कोटी रुपये होते. आताचा आकडा ३८ सहस्र कोटी रुपयांहून अधिक आहे. याचा अर्थ एका दशकापेक्षा अल्प कालावधीत संरक्षण निर्यातीत २५ पटींहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे.

संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !