बांगलादेशी घुसखोरांना बंगालमध्ये घुसखोरीसाठी दलालांनी साहाय्य केल्याचे उघड !
अनेकांनी अनेकदा मतदानही केले !
विशेष सखोल पुनरावलोकनामुळे घुसखोर असल्याचे झाले उघड

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांची हकालपट्टी करण्याचा आदेश देण्यात आल्यानंतर बांगलादेशी स्वतःहून पळून जाऊ लागले आहेत. ते भारतात कसे घुसले ? याची माहिती त्यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी नदी पार करून भारतात प्रवेश केल्याचे सांगितले. काही जणांनी ‘दलाल’ किंवा मध्यस्थ यांनी अंधाराचा अपलाभ घेऊन सीमा ओलांडण्यास साहाय्य केल्याचे सांगितले. ‘सुरक्षादलांची गस्त नसलेल्या काळात अवघ्या १० मिनिटांत भारतात प्रवेश करता येतो’, असे एका व्यक्तीने सांगितले. तसेच काही स्थलांतरितांनी बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ओळखपत्रे मिळवून देण्यास साहाय्य केल्याचा दावा केला. यामुळे त्यांना भारतीय योजनांचा लाभही मिळाल्याचे आणि त्यांनी मतदानही केल्याची स्वीकृती दिली. मतदार सूचीच्या विशेष सखोल पुनरावलोकानंतर त्यांची ओळखपत्रे रहित झाल्यामुळे आणि भाजप सरकार त्यांना हाकलणार असल्याने ते आता स्वतःहून बांगलादेशात परत जात आहेत.
🚨 Shocking Revelation from Bengal!
Brokers helped Bangladeshi infiltrators obtain Indian identity documents, while workers linked to the Trinamool Congress reportedly facilitated the process.
Many infiltrators are said to have voted multiple times, and some even received… pic.twitter.com/EMQ2z1bU80
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 29, 2026
दलालांना पैसे देऊन केली जाते घुसखोरी !
मध्यस्थाला ७-८ सहस्र रुपये देऊन रात्रीच्या वेळी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते आणि गस्तीमध्ये वेळ मिळताच लोकांना सीमा पार करून दिले जाते, अशी माहिती बांगलादेशाच्या कुश्तिया जिल्ह्यातील एका सुताराने दिली. सीमेवर सैनिक तैनात असूनही एका दलाला २० सहस्र रुपये देऊन सीमा ओलांडल्याचा दावा आणखी एका स्थलांतरिताने केला.
तृणमूल काँग्रेस सरकारने दिले सरकारी योजनांचे लाभ !
काही स्थलांतरित महिलांनी ममता बॅनर्जीचे सरकार सत्तेवर असतांना मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड बनवून घेतले. तसेच तृणमूलच्या लोकांच्या साहाय्याने २-३ वर्षे ‘लक्ष्मी भंडार’ योजनेचा लाभही घेतल्याचे सांगितले.
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक