भारताची सुरक्षा आणि लोककल्याण यांसाठी ।। श्री राजमातंगी महायज्ञ ।।


‘यज्ञौ वै श्रेष्ठतमं कर्म: ।’ म्हणजे ‘यज्ञ हे सर्वांत श्रेष्ठ कर्म आहे’, या धर्मवचनानुसार श्री राजमातंगी यज्ञाचे राष्ट्रहितार्थ  भावपूर्ण आणि परिपूर्णरित्या आयोजन करणारी सनातन संस्था !
यज्ञस्थळी श्री राजमातंगी मंडलावर पुष्पार्पण करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, मागे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, सद्गुरु नीलेश सिंगबाळ, बाजूला शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती

संतांची मांदियाळी । दिसे यज्ञस्थळी ।।

सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर एका प्रसन्न भावमुद्रेत !
सद्गुरु सत्यवान कदम, मागे सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) संगीता जाधव !

‘यज्ञौ वै विष्णु: ।’ ‘यज्ञ म्हणजे साक्षात् भगवान विष्णूच !’, या भावानुसार केलेला हा यज्ञ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् श्री राजमातंगीदेवी यांच्या अपार कृपेने पूर्णत्वास गेला !

यज्ञाची महती । भावस्थितीची प्रचीती ।।

जीवनाडीपट्टीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यज्ञस्थळी ध्यानस्थ !
सनातनचे श्री. विनायक शानभाग भावावस्थेत संकल्प म्हणतांना !
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक