US Bangladesh Port Deal : बांगलादेशाने अमेरिकेच्या सैन्याला वापरण्यास दिली चटगाव आणि मतारबारी बंदरे

चटगाव बंदर

ढाका (बांगलादेश) – बांगलादेश आणि अमेरिका यांच्यात ३ करार झाले. यामुळे अमेरिकेच्या सैन्याला बांगलादेशातील चटगाव आणि मतारबारी या २ बंदरांपर्यंत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. करार लागू झाल्यानंतर अमेरिकी नौदलाची युद्धनौका आणि सैनिकी विमाने या बंदरांसह संबंधित वायूदल तळाचा वापर रसद पुरवठा, इंधन भरणे, देखभाल, दुरुस्ती आणि सैनिकांच्या हालचाली यांसाठी करू शकतील. तसेच दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोपनीय सैनिकी आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण होईल. हा करार होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिले होते की, जर संरक्षण करार झाले नाहीत, तर आयात शुल्कात १९ टक्के सवलत आणि सीमा शुल्क कोटा रहित केला जाईल. (अमर्याद शक्तीमुळे दादागिरीचे अत्युच्च टोक गाठणारी अमेरिका ! – संपादक)

यापूर्वी पाकने बांगलादेशाला २ ‘जेएफ्-१७’ प्रशिक्षण विमाने दिली आहेत.  बांगलादेशी वैमानिकांचे प्रशिक्षण आणि विमान संचालन यांच्यासाठी ही विमाने देण्यात आली आहेत. ‘जेएफ्-१७’ हे विमान पाकिस्तान आणि चीन यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.

भारतासाठीची चिंता

चटगाव आणि मतारबारी ही बंदरे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात आहेत. चटगाव हे त्रिपुरातील सबरूम भागापासून ८० कि.मी., तर मतारबारी १५० कि.मी. अंतरावर आहे. यामुळे भारताच्या ईशान्य भागाजवळ अमेरिकी नौदल अधिक काळ तैनात राहू शकते.