Kheda Muslims Encroachment : खेडा (गुजरात) येथे मुसलमानांनी भूमीवर अतिक्रमण करून बांधली दुकाने !

मुसलमान तरुण दुकानाजवळ उभे राहून हिंदु मुलींवर छेड काढतात !

प्रशासनाकडे तक्रार करताना हिंदू (डावीकडे) मुसलमानांची अवैध दुकाने (उजवीकडे)

खेडा (गुजरात) – जिल्ह्यातील चांदणा गावातील भूमीवर अतिक्रमण करणे आणि तेथील हिंदु तरुणींशी गैरवर्तन केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. गावाच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या भूमीवर मुसलमानांनी अतिक्रमण करून तिथे बेकायदेशीर दुकाने बांधल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या दुकानांवर मुसलमान युवकांचे गट जमतात आणि तिथून जाणार्‍या हिंदु महिला अन् तरुणी यांना पाहून अश्लील इशारे आणि अभद्र टिपण्या करतात, असा आरोप हिंदूंनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

१. या दुकानांच्या परिसरात मंदिरे आणि चबूतरा चौक आहे, जिथे नवरात्री अन् भजन यांसारखे धार्मिक कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांच्या वेळीही हे युवक उशिरापर्यंत दुकाने उघडी ठेवून भाविकांवर अभद्र टिपणी करतात, असा आरोप आहे. तसेच गरबा खेळणार्‍या महिलांचे चोरून व्हिडिओ आणि छायाचित्रे काढली जात असल्यामुळे यापूर्वीही तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

२. स्थानिक हिंदु संघटनेचे पदाधिकारी धवलसिंह झाला यांनी सांगितले की, गेल्या ३ वर्षांपासून हे प्रकार चालू आहेत. यावर्षी नवरात्रीत काही मुसलमान युवक कार्यक्रमाच्या ठिकाणाहून वेगाने दुचाकी चालवून अश्लील चाळे करत होते. एका हिंदु अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर ग्रामस्थांनी कागदपत्रांची पडताळणी केली असता, ही दुकाने बेकायदेशी भूमीवर असल्याचे समोर आले. सध्या प्रशासनाने या दुकानांच्या मालकांना नोटिसा बजावल्या असून संबंधितांना वैध कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कागदपत्रे नसल्यास कठोर कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

गुजरातमध्ये गेल्या ३ दशकांहून अधिक काळ भाजपची सत्ता असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! आतापर्यंत या दुकानांवर सरकारने कारवाई करणे अपेक्षित आहे !