
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने आतापर्यंत १ सहस्र ३०० हून अधिक यज्ञ आणि अनुष्ठाने करण्यात आली आहेत. यांतील अनेक अनुष्ठाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी स्वतः केलेली आहेत. या सर्व यज्ञांचा आणि अनुष्ठानांचा संकल्प होता रामराज्य निर्मितीचा !श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या गेली १२ हून अधिक वर्षे भारतभर भ्रमण करून नाडीपट्टीत उल्लेख केल्यानुसार तीर्थक्षेत्री जाऊन धार्मिक विधी आणि अनुष्ठाने करत आहेत. समष्टीच्या कल्याणासाठी अविरतपणे भ्रमंती करणार्या कदाचित् त्या भूतलावरील एकमात्र महिला संत असतील. यज्ञ, तसेच अनुष्ठान यांच्या माध्यमातून प्राप्त होणारी आध्यात्मिक ऊर्जा निश्चितपणे साधकांच्या साधनेला, तसेच सज्जनांच्या धर्मकार्याला गती देते.
कोणत्याही कार्याला गती देण्यासाठी शक्ती आवश्यक असते. रामराज्याच्या निर्मितीची प्रक्रिया ही मुख्यतः आध्यात्मिक स्तराशी निगडित असल्याने रामराज्याच्या निर्मितीला गती येण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जाच आवश्यक असते. समष्टी संकल्पाने होणार्या यज्ञयागातून, तसेच भारतभरात जे कुणी संत-महात्मे आहेत, त्यांच्या तपश्चर्येच्या ऊर्जेतून ही आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते. १७ मे या दिवशी मुंबई येथे होणारा राजमातंगी महायज्ञही साधकांच्या साधनेला गती देणारा, जनकल्याण साधणारा आणि या भारतभूमीभोवती देवीतत्त्वाचे कवच निर्माण करणारा आहे. या महायज्ञामध्ये आपण एकाग्र चित्ताने सहभागी होऊया !
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था (५.५.२०२६)
‘त्यागातून समृद्धी’ हा संदेश देणारी यज्ञसंस्कृती !

भारतीय संस्कृतीमध्ये असलेली यज्ञपरंपरा मोठी विलक्षण आहे. यज्ञ म्हणजे केवळ कर्मकांड नाही, तर ती एक अध्यात्मशास्त्रीय प्रक्रिया आहे. निसर्ग, देवता आणि समाज यांना एकत्र बांधणारे सूत्र म्हणजे यज्ञ !
आज आपण पहातो की, सगळीकडे भोगवृत्ती आहे. ‘मला सर्वाधिक कसे मिळेल’, असा प्रत्येकाचा विचार असतो; पण आपला धर्म, आपली संस्कृती मात्र आपल्याला त्यागाची शिकवण देते. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जी अष्टांग साधना सांगितली आहे, त्यामध्येही त्यागाला महत्त्व आहे. (अष्टांग साधना – स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, अहं-निर्मूलन, नामजप, भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग आणि प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)) त्यागाचे फळ आनंद आणि कल्याण आहे. यज्ञसंस्कृती आपल्याला ‘त्यागातून समृद्धी’ हा मुख्य संदेश देते.
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था (५.५.२०२६)
१. यज्ञकुंडाची रचना

यज्ञामध्ये यज्ञकुंडाच्या रचनेला अत्यंत महत्त्व आहे. ‘शुल्बसूत्र’ या ग्रंथामध्ये कुंडाचे विविध (चौरस, वर्तुळ, त्रिकोण, अर्धवर्तुळ ) आकार कसे असावेत, याचे सविस्तर वर्णन आहे. हे आकार गणिताच्या आणि भूमितीच्या प्रगत ज्ञानाचे प्रतीक आहेत. यज्ञाचा प्रकार आणि त्यामध्ये दिल्या जाणार्या आहुतींची संख्या यांनुसार यज्ञकुंडाचा आकार निश्चित केला जातो. यात काडीमात्र पालट झालेला नाही. सहस्रो वर्षे उलटूनही या परंपरेतील मंत्र, विधी आणि कुंडांची रचना पालटलेली नाही. वेदनारायणाचे हे शाश्वत आणि सनातन स्वरूप आहे.
२. यज्ञाचा संकल्प
यज्ञामध्ये मंत्र महत्त्वाचे असतात, ते करणारे पुरोहित महत्त्वाचे असतात, यज्ञामध्ये जे अर्पण केले जाते, ते हविर्द्रव्य (यज्ञात अर्पण करायची सामग्री) महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे यज्ञाचा संकल्पही महत्त्वाचा असतो. आपल्याकडे पूर्वी जे यज्ञयाग केले जायचे, त्याचा संकल्प व्यापक असायचा, विश्वकल्याणाचा असायचा. आताही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने मुंबईत जो राजमातंगी महायज्ञ होत आहे, त्याचा उद्देश लोककल्याण आणि भारताचे संरक्षण हा आहे. उच्च कोटीच्या संतांनी या यज्ञाचा संकल्प करणे, त्यांची उपस्थिती या यज्ञाला लाभणे आणि विद्वान पुरोहितांच्या माध्यमातून शास्त्रोक्त यज्ञ होणे, हा एक त्रिवेणी संगम आहे. आपल्याला आज या महायज्ञामध्ये सहभागी होण्याची दुर्लभ संधी मिळत आहे. ही एक प्रकारे श्री राजमातंगीदेवीची आपल्यावर असलेल्या कृपेची प्रचीती आहे !
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था (५.५.२०२६)
सध्याच्या युद्धकाळात तपोभूमी भारतभूमीला संरक्षककवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी; म्हणून सनातन संस्थेने ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ आयोजित केला आहे. या महायज्ञाचा प्रारंभ श्री गणेश आवाहन, पुण्याहवाचन आणि महासंकल्प यांनी होईल. श्री राजमातंगीदेवीच्या मूलमंत्राचे पारायण करत आहुती देण्यात येईल. महापूर्णाहुती आणि सामूहिक प्रार्थना यांनी या महायज्ञाची सांगता होणार आहे. या वेळी श्री राजमातंगीदेवीची स्तुती करून भारताचा सर्वांगीण विकास आणि रक्षण यांसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात येईल !सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी धर्मकार्याचा आरंभ केला, त्या मुंबादेवीच्या नगरीत आयोजित हा महायज्ञ म्हणजे ‘रामराज्य निर्मिती’ च्या दिशेने उचललेले ऐतिहासिक पाऊलच ! या यज्ञाचा आध्यात्मिक लाभ आपण सपरिवार उपस्थित राहून अवश्य घ्यावा, ही विनंती !
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था (५.५.२०२६)
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी उपयोगात आणलेल्या साहित्याचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात लावलेले प्रदर्शन पहातांना पू. सदाशिव (भाऊ) परब यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे थेट प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती !