‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !
![]()
१. तीन प्रकारचे युवक
‘आपल्याकडे ३ प्रकारचे युवक असतात. एक सकाळी उठून भ्रमणभाषवर एका मागोमाग ‘रिल’ पहात रहातात आणि सकाळी न्याहारी करून त्यांच्या कामावर निघून जातात. दुसर्या प्रकारचे युवक भ्रमणभाषवर ‘रिल’ पहातात. त्यांना थोडेफार कार्य करण्याची इच्छा असते; पण त्यातून त्यांना काहीतरी लाभ मिळण्याची अपेक्षा असते. तिसर्या प्रकारच्या युवकांना काहीही अपेक्षा न करता निष्कामपणे हिंदुत्वाचे कार्य करायचे असते. अशा ३ प्रकारच्या लोकांविषयी सहस्रो वर्षांपूर्वी गीताचार्यांनी सांगितले आहे. पहिले तमोगुणी, दुसरे रजोगुणी आणि तिसरे सत्त्वगुणी असतात, जे स्वतःहून खरोखर कार्य करत असतात.
२. ‘जागो भारत’ कार्यक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालयांमध्ये जागृती
सत्त्वगुणी युवक स्वतःहून कार्य करत असतात. तमोगुणी युवकांना कितीही राष्ट्र आणि धर्म कार्यात ओढण्याचा प्रयत्न केला, तरी ते येणार नाहीत; परंतु या दोन्हींच्या मध्ये असणार्या रजोगुणी युवकांची संख्या अधिक प्रमाणात आहे. ‘त्यांना कर्मयोगात व्यस्त ठेवा’, असे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे. ‘पुष्कळ युवकांना आकर्षित करणारे राष्ट्रप्रेम हे एक मोठे माध्यम आहे’, असे स्वामी विवेकानंद म्हणतात. हे लक्षात घेऊन आम्ही ‘जागो भारत’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गायक आणि व्याख्याते यांच्यासह प्रत्येक महाविद्यालयात कार्यक्रम केले. राष्ट्रभक्तीची गाणी ऐकल्यानंतर आणि राष्ट्रप्रेम जागृत करणारे व्याख्यान ऐकल्यानंतर आमच्याकडे मोठ्या प्रमाणात युवक आकर्षित झाले.
श्री. चक्रवर्ती सुलीबेले यांचा परिचय

बेंगळुरू, कर्नाटक येथील श्री. चक्रवर्ती सुलीबेले हे ‘युवा ब्रिगेड’चे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या प्रेरणेने आज सहस्रो युवक राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करत आहेत. ते ‘निवेदिता प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करतात. त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांसंदर्भात अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी ‘युवा ब्रिगेड’ संस्थेच्या माध्यमातून १२ हून अधिक पवित्र नद्या आणि १०० हून अधिक मंदिरे यांची स्वच्छता केली आहे. या कार्यासाठी त्यांना कर्नाटक सरकारने ‘कर्नाटक राज्योत्सव अवॉर्ड’ देऊन गौरवले आहे. त्यांना ‘वीर सावरकर’ पुरस्कार मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांच्या मंदिर स्वच्छता उपक्रमाची प्रशंसा केली आहे.
‘युवा ब्रिगेड’च्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही काश्मीरचा इतिहास, हिंदूंचा वंशविच्छेद, पोर्तुगिजांनी गोमंतकातील लोकांवर केलेले धार्मिक अत्याचार यांविषयी माहिती देणारे पुस्तके छापली आहेत, तसेच इतिहासावर आधारित पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत. आम्ही ‘युवा ब्रिगेड’च्या माध्यमातून गेल्या १० वर्षांपासून कार्य करत आहोत. यापुढे ‘धर्मसंचलन’ शाखेच्या माध्यमातून धर्मावरील आघातांच्या विरोधात कार्य करण्याचा मानस आहे.’
३. कर्नाटकातील मंदिरे आणि जलाशयांची स्वच्छता
गोव्यातील मंदिरे अतिशय सुंदर असून त्यांचा परिसर अतिशय स्वच्छ आहे. त्यांची तळेही पुष्कळ स्वच्छ असतात. कर्नाटकमध्येही मंदिरांजवळ तळे आहेत; पण ती कचर्याने भरलेली आहेत. हे लक्षात आल्यानंतर ती सर्व तळे आमच्या ‘जागो भारत’च्या युवकांकडून स्वच्छ करून घेतली. या युवकांनी प्रतिदिन २ घंटे प्रमाणे ३०० दिवस तळे स्वच्छ करण्याचे काम केले. त्यानंतर कोरड्या तळ्यांमध्ये पाणी सोडण्यात आले. आता या तळ्यांमध्ये पुष्कळ लोक पोहण्यासाठी येतात आणि त्यानंतर ते मंदिरात देवाला नमस्कार करून जातात. अशा प्रकारे कर्नाटकातील २५० हून अधिक जलाशयांचे पुनरुज्जीवन केले. या कार्यातून आम्हाला पुष्कळ सारे नवीन युवक मिळाले. आम्ही मंदिरांची स्वच्छता केल्यानंतर ती नियमित स्वच्छ ठेवण्यासाठी तेथील कार्यकर्त्यांकडे सोपवली. या कार्यामुळे मंदिरातील भाविकही आमच्याशी जाेडले गेले.
| हे ही वाचा → हिंदु धर्म, मंदिरे यांच्या रक्षणासह ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आणि जातीभेद मिटवण्यासाठी कार्य करणारे कर्नाटकातील प्रखर वक्ते श्री. चक्रवर्ती सुलीबेले ! |
४. नदी स्वच्छता अभियान
दुसर्या टप्प्यात आम्ही ९-१० नद्यांची स्वच्छता केली. हे काम अत्यंत कठीण होते. या कार्याला ‘जनजीवन’ असे नाव दिले. प्रथम आमचे कार्यकर्ते नदीत उतरून लोकांनी टाकलेला कचरा बाहेर टाकायचे. हे कार्य पाहिल्यानंतर स्थानिक युवकांनी त्यांची नदी प्रतिवर्षी स्वच्छ करण्याची इच्छा व्यक्त केली. अशा प्रकारे एकत्रितपणे नदी स्वच्छ ठेवण्याची भावना त्यांच्या मनात जागृत झाली. आम्ही केवळ नदीची स्वच्छता करून परत गेलो नाही. नदीची स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर आम्ही तेथे नदीची आरती करण्याची परंपरा चालू केली. मैसुरूजवळ असलेल्या नंजनगुडमध्ये प्रतिवर्षी कपिला आरती होते. तेथील स्थानिक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे मंदिर आणि नदी स्वच्छ करण्याचे कार्य करतात. अशा प्रकारे कर्नाटकमध्ये ५-६ नद्यांची प्रतिवर्षी स्वच्छता केली जाते.
५. हिंदु देवतांचा अवमान थांबवणे
अनेक जण देवतांची चित्रे धातूच्या चौकटीसह एखाद्या वृक्षाच्या खाली ठेवून जातात. अशी चित्रे एकत्र करून त्याच्या काच आणि चौकट वेगळ्या केल्या अन् उर्वरित चित्रे एका खड्ड्यात पुरली. आम्ही या अभियानाचे नाव ‘कणकण में शिव’ असे ठेवले. आमचे कार्यकर्ते प्रत्येक रविवारी गावागावात जाऊन हे कार्य करतात.
६. ‘विवेक माला’ उपक्रम
अमेरिका येथे जाऊन लोकांना हिंदुत्वाविषयी सांगितले पाहिजे, असा विचार स्वामी विवेकानंद यांच्या मनात आला होता. त्यांच्यासाठी हा दैवी संकेत होता. या पार्श्वभूमीवर ‘विवेक माला’ धारण करण्याचे ठरले. यानुसार १२ जूनच्या जवळपास असणार्या रविवारी आम्ही सर्वजण कन्याकुमारीला जातो. आज या उपक्रमात ‘विवेक माला’ धारण करणारे १ सहस्र लोक असतात. मालाधारी असतांना सकाळी लवकर उठून व्यायाम आणि दंडकाठीचा सराव करणे, स्वतःमध्ये स्वयंशिस्त बाणवणे अन् स्वामी विवेकानंद यांची शिकवण वाचून हिंदुत्वाचे कार्य करण्याचा विचार करणे, या गोष्टी केल्या जातात.
७. हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात जनजागृती
‘निवेदिता प्रतिष्ठाना’च्या माध्यमातून आम्ही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ४० भित्तीपत्रके बनवली. जेथे कुठे मोठा कार्यक्रम असेल, तेथे या भित्तीपत्रकांचे प्रदर्शन लावले आणि लोकांचे प्रबोधन केले. कर्नाटकमध्ये विविध जातींतील अनेक संतांना निमंत्रित करून ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर इत्यादी हिंदूंवरील आघातांच्या विरोधात एका दिवसाचे सत्र आयोजित केले. हा कार्यक्रम पुष्कळ यशस्वी झाला.
कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याने हिंदूंविषयी अपशब्द काढले. मी त्याला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर त्या काँग्रेस नेत्याच्या बालेकिल्ल्यात कार्यक्रम केला आणि तेथे संपूर्ण गाव एकत्र आले. त्यामुळे हिंदुत्वाच्या विरोधात बोलणार्यांच्या मनात भीती निर्माण झाली.
– श्री. चक्रवर्ती सुलीबेले, संस्थापक अध्यक्ष, युवा ब्रिगेड, कर्नाटक.
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
भाजपचे आमदार शंकर जगताप यांचे सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र