सनातनला संपवण्याच्या विधानावर देशभरातून टीका झाल्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांचे हास्यास्पद स्पष्टीकरण !

चेन्नई (तमिळनाडू) – माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. मी लोकांनी मंदिरात जाण्याविरुद्ध नाही, केवळ तिथे जातीच्या आधारावर जो भेदभाव होतो, त्याविरोधात आहे. ती विचारसरणी संपवायला हवी, असे स्पष्टीकरण द्रमुकचे नेते आणि राज्याचे माजी उपमख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘भेदभाव करणार्या सनातनला संपवले पाहिजे’ या विधानसभेत केलेल्या विधानावर दिले आहे. या विधानावरून त्यांच्यावर देशभरातून टीका झाली होती.
🚨 After facing nationwide backlash over his remarks on “eradicating Sanatan,” Udayanidhi Stalin now claims:
"I am not against people visiting temples, but against discrimination!"If a similar statement had been made about eradicating Islam or Christianity, would he still have… https://t.co/IOL9Hbwl8w pic.twitter.com/f6Xeh2ZNTa
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 15, 2026
उदयनिधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की,
१. तमिळनाडू विधानसभेत जेव्हा मी म्हटले होते की, ‘लोकांना विभागणार्या सनातनाचा अंत व्हायला हवा’ तेव्हा काही लोक माझ्यावर टीका करत आहेत; पण मी अशा टीकेला घाबरणार नाही.
२. द्रविड चळवळ नेहमीच विरोधातून पुढे गेली आहे; म्हणून मला केवळ एक छोटी गोष्ट स्पष्ट करायची आहे. जेव्हा मी म्हणतो की, ‘सनातनाचा अंत व्हायला हवा’, तेव्हा याचा अर्थ असा नाही की, कुणी मंदिरात जाऊ नये. याचा अर्थ असा आहे की, केवळ मंदिरातच नाही, तर समाजातही सर्व लोकांना समान अधिकार मिळायला हवेत. मी त्या विचारसरणीचा अंत करण्याची गोष्ट करत आहे, जी लोकांना उच्च आणि नीच जातींमध्ये विभागते. मी तेच विचार मांडत आहे, ज्यांची पेरियार, आंबेडकर, अण्णा आणि करुणानिधी यांनी चर्चा केली होती. आम्ही कोणाच्याही देवावरील श्रद्धेच्या विरोधात नाही; पण असमानता आणि शोषण यांना आम्ही तीव्र विरोध करू.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा