पाकिस्तानमधून करत होता अमली पदार्थ तस्करीचा धंदा !

नवी देहली – अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.) १३ मे या दिवशी अमली पदार्थांची तस्करी करणार्या आतंकवादी इक्बाल सिंह उपाख्य शेरा याला अटक केली. पोर्तुगालमधून देहलीत प्रत्यार्पण होताच ‘एन्.आय.ए.’ने त्याला विमानतळावर अटक केली. तो ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित होता. तो पाकिस्तानमधून अमली पदार्थ आणून ते भारतात विकत असे. ‘एन्.आय.ए.’ने सांगितले की, शेरा वर्ष २०२० पासून पसार होता.


त्याला पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याला भारतात आणण्यात आले आहे. शेरा हा मूळचा अमृतसरचा रहिवासी आहे. तो ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या आतंकवादी संघटनेच्या साहाय्याने पाकिस्तानच्या सीमेवरून भारतात अमली पदार्थ तस्करीचा धंदा करत होता.
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक