सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने !
विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांसह ३ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंचा सहभाग

कोल्हापूर – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ९ मे या दिवशी तिथीनुसार वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या आणि श्री महालक्ष्मीदेवीच्या कृपेने पावन झालेल्या करवीरनगरीत १० मे या दिवशी भव्य अशा ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. या फेरीत विविध संप्रदाय आणि आध्यात्मिक संस्था यांसह ३ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंनी सहभागी होऊन हिंदू ऐक्याचा गजर केला. या फेरीत सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (कु.) दीपाली मतकर यांची वंदनीय उपस्थिती होती.





अशी झाली दिंडी !
१. मिरजकर तिकटी येथे प्रसिद्ध व्यावसायिक श्री. जयंतीभाई पटेल यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री जोतिबा देव यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले.

२. सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिंडीचा उद्देश स्पष्ट केला.
३. मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) येथे सभेने दिंडीची सांगता झाली.
४. दिंडीत चारचाकी वाहनात असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. दिंडीच्या समोर धर्मध्वज होता, तर मागे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र, श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री जोतिबा देव यांचे चित्र असलेली पालखी अशा ३ पालख्या होत्या. दिंडीत सच्चिदानंद परबह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र असलेला विशेष रथ सिद्ध करण्यात आला होता. दिंडी जात असतांना वाटेत धर्मध्वजाची आरती ओवाळून, तसेच पुष्पवृष्टी करून अनेकांनी दिंडीचे स्वागत केले.


उपस्थित मान्यवर
ह.भ.प. महादेव यादव महाराज, वैद्यराज अण्णा श्री. घाटगेमहाराज, चिन्मय मिशन’चे स्वामी दत्ताराजानंद, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री. आप्पा लाड, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे आणि श्री. नितीन काकडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, श्री. कृष्णात पवार, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, ‘हिंदु एकता आंदोलना’चे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, श्री. हिंदुराव शेळके, श्री. दिलीप भिवटे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, अखिल भारत हिंदु महासभेचे उपाध्यक्ष श्री. रमेश भोरे, श्री. विकास जाधव, श्री. नंदकुमार घोरपडे, श्री. प्रशांत पाटील, हिंदु महासभा महिला आघाडीच्या शीलाताई माने, भाजपच्या सौ. वंदनाताई बंबलवाड, रश्मी साळोखे, अंजली जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. महेंद्र अहिरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव आणि श्री. प्रसाद कुलकर्णी, हिंदुत्वनिष्ठ श्री. चारुदत्त पोतदार, श्री. रमेश पडवळ, ‘सेवाव्रत प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. संभाजी(बंडा) साळुंखे, उद्योजक श्री. प्रसन्न शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे आणि श्री. सुहास लोकरे, ‘श्री संप्रदाया’चे जिल्हाध्यक्ष श्री. कृष्णात माळी, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री श्री. विनय बारड, श्री. अशोक रामचंदानी, श्री. अनिल दिंडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, चिकोडी (कर्नाटक) येथील श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. अमोल चेंडके
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धर्मसेवकांना मार्गदर्शन’, या ग्रंथाचे प्रकाशन !
समारोपाच्या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धर्मसेवकांना मार्गदर्शन’, या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

सहभागी संप्रदाय, संघटना, पक्ष
वारकरी संप्रदाय, श्री संप्रदाय, भजनी मंडळे, ‘भागीरथी महिला मंच’, चिन्मय मिशन, ‘इस्कॉन’, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ, भजनी मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भाजप, शिवसेना

क्षणचित्रे
१. ‘सव्यासाची गुरुकुलम्’ आणि ‘श्रीराम गुरुकुलम्’ यांनी चित्तथरारक शिवकालीन युद्धकलांच्ो सादरीकरण केले.
२. मर्दानी खेळांचे पथक, लेझीम पथक, गदा पथक, शाहिरी पथक, बासरी पथक, वानरसेना पथक, ढोलपथक, प्रथमोपचार पथक, लाठीकाठीची प्रात्यक्षिके दाखवणारे ‘रणरागिणी’ पथक, टाळ-मृदंग घेतलेले वारकरी पथक अशा ७० पथकांचा दिंडीत समावेश होता.


३. नऊवारी साडी परिधान केलेल्या कलशधारी महिला, पारंपरिक वेशातील साधक, स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करणारे क्षात्रवीर दिंडीत सहभागी झाले होते.
४. श्री. धोंडिराम तोपडे यांनी त्यांच्या दिव्यांग (अपंग) तरुण मुलास ढकलगाडीत ठेवले आणि ते दिंडीत सहभागी झाले होते.
५. हुपरी येथील श्री. विद्यासागर पाटील जीप घेऊन सहभागी झाले. जीपवर छत्रपती शिवरायांची मूर्ती ठेवण्यात आली होती.

विशेष

१. दिंडीच्या ध्वजपथकासमवेत एक काळ्या रंगाचा श्वान सहजतेने चालत होता. तो शेवटपर्यंत पथकासमवेत होता. त्याच्या केसांना चकाकी होती. तो काळभैरव देवाचे वाहन असलेल्यांपैकी एक वाटत होता. या श्वानाने तिन्ही पालख्यांच्या जवळ जाऊन डोके टेकवले. ‘सर्व हिंदू संघटित झाल्याचा आनंद झाला आणि लवकरच हिंदु राष्ट्र येणार’, असे त्याला वाटत होते’, असे उपस्थितांना जाणवले.
२. शिवकालीन युद्धकलांचे सादरीकरण आणि स्वरक्षण प्रात्यक्षिके यांचे समाजातील अनेकांनी भ्रमणभाषणमध्ये ध्वनीचित्रीकरण केले.
३. सौ. पूजा आणि श्री. विशाल शिराळकर, तसेच श्री. चैतन्य सूर्यकांत शेटे यांनी खरी कॉर्नर येथे संपूर्ण रांगोळी काढून दिंडीचे स्वागत केले होते.
४. सौ. स्वाती सारंग कुलकर्णी यांनी बिनखांबी गणेश मंदिर येथे दिंडीचे स्वागत केले.
५. भाजपच्या नगरसेविका सौ. दीपा ठाणेकर आणि श्री. अजित ठाणेकर यांनी दिंडीचे स्वागत केले.
६. ‘श्री मेटल्स’चे श्री. रघुनंदन वणकुंद्रे यांनी महाद्वार रोड येथे दिंडीचे स्वागत केले.
७. ‘आनंद श्यू हाऊस’चे श्री. अमित ठोमके, श्री. विलास ठोमके, सौ. शोभा ठोमके आणि श्री. अमर कारंडे यानी दिंडीचे स्वागत केले, तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले.
८. समाजातील अनेक लोकांनीही दिंडीच्या मार्गावर स्वागतासाठी भव्य रांगोळ्या काढल्या होत्या.
‘हिंदु एकता आंदोलना’च्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या देखाव्याने जागृती !

दिंडीत ‘लव्ह जिहाद’ची भयावहता दर्शवणारा देखावा ‘हिंदु एकता आंदोलना’च्या वतीने सादर करण्यात आला होता. यात पीडित हिंदु तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते शीतकपाटात भरून त्यांना कशा प्रकारे प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते, ते दाखवले होते. या देखावा सिद्ध करण्यासाठी शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, सर्वश्री हिंदुराव शेळके, विलास मोहिते, ओंकार तोडकर आणि सुधाकर वडगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

मान्यवरांचे मनोगत
संतांनी हिंदू ऐक्याच्या कार्यास प्रारंभ केला असून प्रत्येकाने त्यात सहभागी व्हावे ! – श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर आनंदसिद्ध महाराज, मठाधिपती, आसुर्ले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यासह संतांनी हिंदू ऐक्याच्या कार्यास प्रारंभ केला असून प्रत्येकाने त्यात सहभागी होणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी प्रत्येकाने वेळ देणे आवश्यक आहे. आपण जर प्रयत्न केले नाहीत, तर आपले अस्तित्व निश्चित धोक्यात आहे !
ही दिंडी म्हणजे रामराज्याची पायाभरणी ! – सद्गुरु स्वाती खाडये

या दिंडीत सहभागी झालेला प्रत्येक जण पद-प्रतिष्ठा विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून एकत्र आला आहे. ही दिंडी म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी फुंकलेले रणशिंग आहे. ही दिंडी म्हणजे हिंदू ऐक्याचे प्रतीक आहे. ही दिंडी म्हणजे रामराज्याची पायाभरणी आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण ‘आठवड्यातून एका तरी व्यक्तीला हिंदु धर्माच्या महानतेविषयी सांगेन’, असा संकल्प करूया, तसेच ‘हिंदु धर्म-राष्ट्रपुरुष यांवर होणार्या आघातांना उत्तर देण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करीन’, असा निर्धार करावा.
‘राष्ट्रपुरुष, संत यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही’, अशी चेतावणी देण्याची वेळ आली आहे ! – वैद्या अश्विनी माळकर, ‘आरोग्यभारती’

हिंदु धर्माची महानता कळण्यासाठी या दिंडीचे आयोजन आहे. हिंदूंच्या प्रत्येक देवतेच्या हातात शस्त्रे आहेत. ही शस्त्रे अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरून समाजात फूट पाडली जात आहे. ‘यापुढे आपले राष्ट्रपुरुष, संत यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही’, अशी चेतावणी देण्याची वेळ आली असून हिंदूंनी जात-पात यांत न अडकता हिंदु म्हणून एकत्र आले पाहिजे.
हिंदूंसाठी आज नाही, तर कधीच नाही अशी धोक्याची घंटा वाजली आहे ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

सच्चिदानंद परबह्म डॉ. जयंत आठवले यांनी सातत्याने हिंदु समाजाचा विचार करण्यास शिकवले. वर्ष १९९० पासून ते हे कार्य करत आहेत. वर्ष १९२५ पासून ते २०२५ पर्यंत म्हणजे १०० वर्षांचा विचार केल्यास हिंदूंची संख्या वाढलेली नाही. धर्मांधांची वाढती संख्या आणि हिंदूंची घटती लोकसंख्या हे आपल्यासाठी चिंताजनक आहे. ‘हिंदूंसाठी आज नाही, तर कधीच नाही’, अशी धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळे बांधवांनो, संघटित व्हा, संघर्ष करा आणि साधना करा !
प्रतिक्रिया
१. सर्व समाजाने आदर्श घेण्यासारखी आणि हिंदूंना संघटित करणारी हिंदू एकता दिंडी ! – दीपक देसाई, जिल्हाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन
कोल्हापूर शहरात निघालेली हिंदू एकता दिंडी ही प्रत्येक हिंदू, समाजघटक, तरुण मंडळे यांच्यासाठी आदर्श होती. हिंदूंना संघटित करणारी दिंडी ही नियोजनबद्ध आणि सांघिक ऐक्य निर्माण करणारी होती.
२. रश्मी साळोखे, भाजप, लक्ष्मीपुरी मंडल अध्यक्ष, कोल्हापूर : धर्मध्वज पूजन अतिशय चांगले झाले. नवीन पिढीला धमार्च संदेश देण्यासाठी दिंडी उपयुक्त आहे. हिंदु धर्म महान आहे. आताच्या पिढीला धर्माचे महत्त्व कळेल.
३. सौ. मेधा क्षीरसागर, लक्ष्मीपुरी मंडल, सरचिटणीस, भाजप : हिंदु धर्मातील महिलांनी समाजात जाऊन हिंदु धर्माचा प्रसार केला पाहिजे.
४. सौ. कृष्णावली शेळके, इस्कॉन : सनातन धर्म पुढे गेला पाहिजे. रामराज्य आले पाहिजे.
५. श्री. सुधीर नेर्लेकर : हिंदूंची एकजूट पाहून चांगले वाटले.
६. श्री. संग्राम विलासराव पोवार, हिंदु एकता आंदोलन : ‘दिंडी पाहून हिंदु संस्कृतीचे जतन होत आहे’, असे वाटले. या कार्यात सहभागी होण्यास निश्चित आवडेल.
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !