‘फ्रान्सिस झेविअर’च्या अवशेषांविषयी लेखमाला - भाग ६
भाग ५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1037783.html
या अवशेषांजवळ एक रत्नजडित राजदंडही होता. हा राजदंड ही गोव्यावर राज्य करण्याची निशाणी होती आणि संत झेवियरच्या आज्ञेने गव्हर्नर हा राजदंड घेऊन गोव्याचे राज्य करत होता.
‘वर्ष १९६१ मध्ये भारतीय फौजा गोव्यात शिरू लागल्या आणि सालाझारने संत झेविअरचे शव असलेली रूपेरी पेटी पोर्तुगालला पाठवून देण्याचा आदेश दिला.’
‘आतल्या शवापेक्षा रूपेरी पेटीच्या आकर्षणाने हा आदेश दिला होता. गुप्त पोलीस शव न्यायला आले, तेव्हा व्हासाल द सिल्वा यांनी हे शव झेविअरचे नसून कॅनन गोम्सचे आहे, ही गोष्ट त्यांना सांगितली आणि पुरावा म्हणून ओल्ड गोव्याच्या सेंट कॅजेटन चर्चमध्ये कॅनन गोम्सची शवपेटी खोलून दाखवली. त्या पेटीत गोम्सचे शव नव्हते. केवळ त्याचा लाकडी पुतळा शवाच्या जागी होता.’
‘यामुळे रूपेरी पेटीत आणि त्यातील ते तथाकथित संताचे शव गोव्यातच राहिले; मात्र पोर्तुगालला परततांना रत्नजडित राजदंड मात्र व्हासाल द सिल्वाने स्वतःच्या बरोबर नेला’, असे विन्सेंट कोरिया आफोंसोचे म्हणणे आहे.
– स्व. नारायण आठवले, संपादक, दैनिक ‘गोमंतक’.
(साभार : दैनिक ‘गोमंतक’, २८.४.१९८५)
भाग ७ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1038815.html

अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !