‘फ्रान्सिस झेविअर’च्या अवशेषांविषयी लेखमाला - भाग ७
भाग ६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1038127.html

सेंट फ्रान्सिस झेविअर याचा अविनाशी देह निश्चितपणे कुठे आहे, हे सांगणे कठीण आहे; पण ‘सेंट बासिलिकेत रूपेरी पेटीत ठेवण्यात आलेला देह सेंट झेविअरचा नाही, तो कॅनन गोम्स या केळशीच्या पाद्र्याचा आहे’, असा दावा करणारा हा लेख आजवर गुपित राखलेले एक रहस्य उघड करत असून त्याची नोंद गोवा शासनाने आणि गोवा आर्चबिशपने घ्यायला हवी.
‘वर्ष १९५२ मध्ये गोम्स कुटुंबियांनी रूपेरी पेटीतील शव पुरण्यासाठी ताब्यात द्यावे, अशी मागणी केली होती. त्या वेळी असलेले अनेक जण आजही गोव्यात आहेत. त्यांनी या प्रकरणी त्यांना ठाऊक असलेले आणि त्यांनी ऐकलेले सत्य सांगायला पुढे यायला हवे.’
‘झेविअरचे शव म्हणून कुणाचा तरी सांगाडा दाखवून लोकांना झुलवण्याचा उद्योग धर्मश्रद्धेच्या नावाने चालवला जावा, ही गोष्ट अत्यंत गैर आहे. सरकार या गैरगोष्टीत सहभागी होते, हे तर त्याहून गैर आहे.’
‘सबब या प्रकरणी सत्य बाहेर यायलाच हवे. त्याच हेतूने आम्ही विन्सेंट कोरियाच्या ‘संडे ऑब्जर्व्हर’मधील लेखाची नोंद घेतली असून गोव्यातील वयोवृद्ध सद्गृहस्थांनी या प्रकरणी जे जे ठाऊक असेल, ते ते सांगण्यासाठी पुढे यावे, असे आमचे आवाहन आहे.’
(लेख समाप्त)
– स्व. नारायण आठवले, संपादक, दैनिक ‘गोमंतक’.
(साभार : दैनिक ‘गोमंतक’, २८.४.१९८५)
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !