‘फ्रान्सिस झेविअर’च्या अवशेषांविषयी लेखमाला – भाग ५
भाग ४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1037389.html
‘… पण वर्ष १९५२ मध्ये गोव्याचा पोर्तुगीज पॅट्रिआर्च कॉस्टा नुनीस याच्याकडे गोम्स कुटुंबाने ‘कॅनन गोम्सचा देह केळशीच्या दफनभूमीत पुरण्यासाठी मिळावा’, अशी मागणी केली, तेव्हा पॅट्रिआर्च नुनीस यांनी डॉ. पाचेको फिगरेदो यांना सदरच्या देहाची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.
देह पालटल्याची वार्ता गुप्त ठेवली गेली असली, तरी लोकांत त्याबद्दल कुजबूज चालूच होती. खेरीज गव्हर्नर आणि आर्चबिशप यांनाही ही फसवणूक ठाऊक होती. त्यांच्या बोलण्यातून ही गोष्ट इतरत्रही पसरत होती.
‘डॉ. फिगरेदो यांनी देहाची पहाणी केली आणि ‘अविनाशी देह तिथे नाही, रिकामी कवटी आणि भरजरी अंगरख्याआड हाडांचा ढिगारा तेवढा होता’, असे म्हटले. पॅट्रिआर्च नुनीस यांनीही मग देहाची पहाणी केली आणि अविनाशी देह नाही; केवळ ‘पवित्र अवशेष’ आहेत, असे म्हटले.’
मात्र गोम्स कुटुंबाच्या मागणीनुसार हे अवशेष त्यांनी कुटुंबाच्या स्वाधीन केले नाहीत. ते पॅट्रिआर्चच्या ताब्यातच रहावेत, असे ठरवले.’
– स्व. नारायण आठवले, संपादक, दैनिक ‘गोमंतक’.
(साभार : दैनिक ‘गोमंतक’, २८.४.१९८५)
भाग ६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1038127.html

शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !