
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लिखाण – विज्ञानाने मानवाची सर्वांगांनी केलेली हानी
‘विज्ञानाने माणसाला सुखलोलूप बनवले. त्यामुळे तो खर्या आनंदापासून, म्हणजे ईश्वरापासून अधिकाधिक दूर जात आहे आणि त्यामुळे अधिकाधिक दुःखी, तसेच हिंसक (आसुरी) होत आहे.’ (श्रावण शु. ११, कलियुग वर्ष ५११३ (९.८.२०११))
२. वरील विषयाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

२ अ. विज्ञानाची प्रगती वेगाने होण्यामागील आध्यात्मिक कारण : ‘गेल्या १०० वर्षांत व्यक्ती साधना आणि धर्माचरण यांपासून दूर गेली. त्यामुळे तिच्या जीवनात दुःख अधिक आणि सुख अल्प झाले. असे असले, तरीही सर्वांवर सनातन धर्माचा पगडा होता. पाताळातील वाईट शक्तींना सनातन धर्म नामशेष करायचा आहे. त्या वाईट शक्तींनी या परिस्थितीचा लाभ घेण्याचे ठरवले. चौथ्या पाताळात ‘येहू’ नावाची एक वाईट शक्ती आहे. तिने वेगाने सुख मिळवणारे भासमान जग निर्माण करण्याचे ठरवले. यासाठी ‘विज्ञानात प्रगती झाल्यास दुःखी व्यक्ती सुखाकडे वळेल आणि ती भासमान जगात रमल्याने तिला सनातन धर्माचा विसर पडेल’, या विचाराने ‘येहू’ या वाईट शक्तीने विज्ञानाचा आधार घेण्याचा निश्चय केला.
२ अ १. ‘येहू’ या वाईट शक्तीने विज्ञान प्रगत होण्यासाठी केलेले कार्य : ‘येहू’ या वाईट शक्तीला वैज्ञानिक संशोधनाविषयी सूक्ष्मातील सखोल ज्ञान आहे. तिने अन्य वाईट शक्तींच्या साहाय्याने अनेक वैज्ञानिकांना विविध शोध लावण्यासाठी सूक्ष्मातून ज्ञान, तसेच प्रेरणा दिली. त्यामुळे वैज्ञानिकांनी अल्प कालावधीत विविध शोध लावले. वैज्ञानिक शोधांमध्ये मायावी आकर्षण असल्याने लोक याकडे सहजतेने आकर्षिले जातात. विज्ञानाद्वारे व्यक्तीला पुष्कळ सुख मिळू लागले. यातून तिला ‘साधना आणि सनातन धर्म’ यांचा विसर पडला. वाईट शक्तीने विज्ञानाद्वारे सनातन धर्मावर मोठा आघात करण्याचे कार्य केले. यात तिला पुष्कळ यश मिळाल्याने सध्याच्या काळात सनातन धर्म नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
२ आ. विज्ञानामुळे व्यक्ती सारासार विवेकबुद्धी गमावून बसणे : व्यक्तीच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत; परंतु पुढे व्यक्तीची ‘विज्ञानाद्वारे सुख मिळवणे’, ही गरज बनली. हे सुख मिळवण्यासाठी व्यक्ती अधिकाधिक धन कमावू लागली. यातून व्यक्तीच्या जीवनाचा केंद्रबिंदू ‘धन कमावणे आणि विज्ञानाद्वारे मिळणार्या सुखसोयी उपभोगणे’, हा बनला. अशा व्यक्तीत साधनेमुळे आलेले मनोबल किंवा आत्मबळ नसते. त्यामुळे अशी व्यक्ती ‘रोग उद्भवणे, शारीरिक मर्यादा वाढणे आणि मनाविरुद्ध घडणे’, यांमुळे लगेच दुःखी होते. विज्ञानाच्या आहारी गेल्याने व्यक्तीला ‘जीवनाचे ध्येय ईश्वरप्राप्ती आहे’, याचा विसर पडला आणि या प्रक्रियेत व्यक्ती ‘सारासार विवेकबुद्धी, समाधान, शाश्वत आनंद आणि शांती ’, हे गमावून बसली.
२ इ. व्यक्ती विज्ञानामुळे आसुरी वृत्तीची बनण्याचे कारण : व्यक्तीत विज्ञानामुळे अतीसुख उपभोगण्याचा हव्यास निर्माण झाला. त्यामुळे ती ‘स्वार्थ, संकुचितपणा आणि अहं’ यांनी युक्त बनली. याचा परिणाम म्हणून व्यक्तीत ‘इतरांचा द्वेष करणे आणि इतरांना न्यून लेखणे, स्पर्धा करणे, उपयोगी नसलेले; मात्र मनाला हवे असलेले प्राप्त करण्यासाठी संघर्ष करणे, मान-अपमान यांत अडकणे’, इत्यादी स्वभावदोष निर्माण झाले. याचा परिणाम म्हणून व्यक्तीतील ज्ञानशक्तीचा र्हास झाला. असुर अहंच्या जोरावर तामसिक सुख उपभोगण्यात मग्न असतो, त्याप्रमाणे व्यक्ती अहंच्या जोरावर राजसिक आणि तामसिक सुख उपभोगण्यात मग्न झाली. त्यामुळे व्यक्तीची वृत्ती आसुरी बनली.
२ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या लिखाणाचे महत्त्व : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी लिखाणाद्वारे ‘व्यक्तीच्या जीवनाचे ध्येय ईश्वरप्राप्ती असून विज्ञानामुळे व्यक्ती सुख-दुःख यांत अडकते, तसेच तिच्यात असुरत्व येते’, असे सांगितले. या लिखाणाचे सार ‘व्यक्तीसाठी विज्ञान हे विषसमान असून यातून वाचण्याचा एकमेव उपाय, म्हणजे ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणे’ हाच आहे.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : २५.५.२०२६, वेळ : सकाळी ११, कालावधी : ३० सेकंद)
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !