ग्रेटर नोएडातील घरबरा गावाच्या पंचायतीचा निर्णय
(डीजे म्हणजे मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा)

नोएडा (उत्तरप्रदेश) – लग्नाच्या वरातीत ‘डीजे’ लावण्यावर बंदी घालण्यात आली असून ही बंदी मोडून डीजे लावल्यास संपूर्ण गाव त्या लग्नावर बहिष्कार घालेल, असा निर्णय घरबरा गावाच्या पंचायतीने ३ मे या दिवशी झालेल्या बैठकीत घेतला. असाच निर्णय नुकताच नकौर गावाच्या पंचायतीनेही घेतला आहे. ‘डीजे लावणे हे शांतता आणि संस्कृती यांच्या विरोधात आहे’, असे घरबरा गावातील गावकर्यांचे म्हणणे आहे.
🚫 Big Decision from Greater Noida
The panchayat of Gharbara village has announced a strict resolution
🎶 Weddings with loud ‘DJ’ processions will face a complete boycott by the entire village⚠️ Any violation = Social boycott of the wedding
🔊 Concern: Harmful effects of… pic.twitter.com/8TwXPraJNn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2026
‘डीजे लावणे, हा पैशांचा अपव्यय आहे. डीजेमुळे हृदयाचा आजार असलेल्यांना त्रास होतो. यासह सर्वसामान्य नागरिक, तसेच लहान मुले यांच्याही आरोग्यावर परिणाम होतो. एकूणच जनजीवन विस्कळीत होते. त्यामुळे गावात कुणीही डीजेचा वापर करू नये’, असे आवाहन पंचायतीचे अध्यक्ष वीरेंद्र डाढा यांनी केले आहे.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ