प्रतिदिन वाचा ‘फ्रान्सिस झेविअर’च्या अवशेषांविषयी लेखमाला - भाग २
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1036429.html

‘संत झेविअर याचे अवशेष म्हणून या अवशेषांचे प्रदर्शन करून लोकांच्या श्रद्धांचा अपलाभ घेतला जात आहे’, असे लेखकाचे (विन्सेंट कुर्रिया आफोंसो) म्हणणे असून ‘सरकार या सगळ्याला साहाय्य करते’, ही गोष्ट निश्चितच चमत्कारिक आहे.
‘संत झेविअरच्या अविनाशी देहाचा कधीच विनाश झालेला असतांना तिथे ‘दुसर्याचा मृतदेह ठेवून लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार’ काही मतलबी धर्ममार्तंडांनी करावा आणि ‘सरकारने त्यात सहभागी’ व्हावे आणि ‘पर्यटन खात्याने विज्ञापने करून देशोदेशींच्या लोकांना इथल्या लोकांनी चालवलेला खुळेपणा बघायला बोलवावे’, हा प्रकार भारताखेरीज अन्यत्र कुठे होणार नाही.’
गोव्यातील अनेक वृद्धांना ही सारी फसवणूक ठाऊक असतांनाही ते ‘धार्मिक भावना दुखावल्या जातील’, या भयाने याविषयी काही बोलत नाहीत; पण ‘संडे ऑब्जर्व्हर’मधील लेखाने या प्रकाराला तोंड फोडले असून ही फसवणूक थांबवण्यासाठी गोव्यातील लोकांनी आता पुढे यायची आवश्यकता आहे. निदान ‘सरकारी पैशाचा नाश, ही भंपकगिरी चालू ठेवण्यासाठी यापुढे होऊ नये’, म्हणून प्रयत्न करण्याची जरूरी आहे.’
नुकत्याच (१९८५?) झालेल्या शवप्रदर्शन सोहळ्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की, झेविअरचे अविनाशी शव म्हटले जाणारी गोष्ट आता शिल्लक नाही. ‘नक्षीदार रुपेरी पेटीत आज आहेत एका देहाचे जवळजवळ नष्ट झालेले अवशेष.’
– स्व. नारायण आठवले, संपादक, दैनिक ‘गोमंतक’.
(साभार : दैनिक ‘गोमंतक’, २८.४.१९८५)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1037185.html
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !