आजपासून प्रतिदिन वाचा !
गोव्यातील त्या काळचे राष्ट्रवादाची कास धरणारे लोकप्रिय वृत्तपत्र दैनिक ‘गोमंतक’चे झुंजार संपादक स्व. नारायण आठवले यांचा जेजुईट पाद्री फ्रान्सिस झेविअर यांच्या तत्कालीन शवप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर एक लेख दैनिक ‘गोमंतक’च्या २८ एप्रिल १९८५ या दिवशी रविवारच्या पुरवणीत प्रसिद्ध झालेला आहे. ‘झेविअरच्या अवशेषांची कथा’ या शीर्षकाचा तो लेख निःपक्षपाती वाचकांच्या माहितीसाठी या ठिकाणी टप्प्याटप्याने सादर करण्यास आजपासून चालू करत आहोत.
(भाग १)
… ते संत झेविअरचे अवशेष नाहीत !
काही दिवसांपूर्वीच संत झेविअरच्या शवाचे प्रदर्शन झाले. शासनाने भरपूर पैसा खर्चून शवप्रदर्शनार्थ येणार्या भक्तांची सोय केली. ११ लाख लोकांनी म्हणे संत झेविअरच्या अविनाशी देहाचे दर्शन घेतले; पण ‘खरोखरच या लोकांनी जो बघितला तो संत फ्रान्सिस झेविअरचाच देह होता का ?’
‘गोंयचा सायब’ म्हणून ज्याच्याकडे ख्रिस्ती लोक बघतात, ‘गोव्याचा रक्षणकर्ता’, ‘जागृत संत’ असा ज्याचा लौकिक, त्याचा देह म्हणून बॉम जिझस बासिलिकेत चांदीच्या नक्षीदार पेटीत ‘आज जे काही दिसते, ते संत झेविअरचे अवशेष नाहीत’, असे सांगणारा एक लेख ‘संडे ऑब्जर्वर’च्या १४ एप्रिलच्या (वर्ष १९८५) अंकात प्रसिद्ध झाला आहे. ‘व्हिन्सेंट कोरिया आफोन्सो’ नावाच्या या लेखकाने या लेखात ‘सेंट बासिलिकेत ठेवण्यात आलेले अवशेष हे संत झेविअरचे नसून गोव्यातील एक क्लर्गी कॅनॉन अॅन्टोनियो गोमेस याच्या देहाचे अवशेष आहेत’ असे म्हटले असून ‘ही गोष्ट गोव्यातील अनेकांना ठाऊक आहे’, असा त्याचा दावा आहे.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– स्व. नारायण आठवले, संपादक, दैनिक ‘गोमंतक’.
(साभार : दैनिक ‘गोमंतक’, २८.४.१९८५)

शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !