‘फ्रान्सिस झेविअर’च्या अवशेषांविषयी लेखमाला - भाग ३
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1036833.html

पण २०० वर्षांपूर्वी या पेटीमध्ये एक जिवंत भासणारा देह होता, असे सांगून विन्सेंट कुर्रिया आफोंसो म्हणतात, ‘वर्ष १५५२ मध्ये चीनच्या भूमीवर मरण पावलेल्या स्पॅनिश जेजुईटचा मृतदेह मृत्यूच्या दिवशी जसा होता, तसाच वर्ष १५५४ मध्ये गोव्यात आणण्यात आला.
…पण त्या देहाचे लचके तोडून ते पवित्र स्मृती म्हणून ठेवण्याचा प्रकार भक्तांनी चालू केला. वर्ष १६१४ मध्ये या देहाचा संपूर्ण उजवा हात धर्माधिकार्यांनीच कापून रोमला पाठवला आणि वर्ष १६२६ मध्ये छाती अन् पोटातील अवयव काढून ते वेगवेगळ्या देशात वाटण्यात आले.
म्हणजे २०० वर्षांपर्यंत खरोखरच एक अविनाशी देह होता; पण त्या देहाचे लचके तोडले गेले आणि तो संपूर्ण देहच पुढे गायब झाला. या देहाचा नाश होत आहे, हे लक्षात येऊन रोममधील जेजुईट सुपिरियर जनरलने हा देह ठेवलेली पेटी पुन्हा उघडण्यावर बंदी घातली; पण ती मोडून वर्ष १७४४ आणि वर्ष १७५१ मध्ये देहाचे प्रदर्शन करण्यात आले. हे थांबावे म्हणून पोर्तुगीज राजा डॉयजोस याने या पेटीच्या किल्ल्या ताब्यात घेऊन संत झेवियरच्या देहाचा ताबा घेण्याचा अयशस्वी प्रयोग केला. नंतर त्याचा मंत्री मार्कीसने जेजुईटांना गोव्यातून हाकलून लावले.
याच काळात संत झेविअरचा अविनाशी देहही गायब झाला. ‘संत झेविअरचा देह नाहीसा झाल्याने लोकांत खळबळ माजेल, या भयाने पोर्तुगीज धर्माधिकार्यांनी या देहाच्या जागी दुसरा देह ठेवून लोकांची फसवणूक केली’, असे विन्सेंट कुर्रियाचे म्हणणे आहे.’
– स्व. नारायण आठवले, संपादक, दैनिक ‘गोमंतक’.
(साभार : दैनिक ‘गोमंतक’, २८.४.१९८५)
भाग ४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1037389.html
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
पावसाळी अधिवेशनात मराठी राजभाषेचे विधेयक मांडून मराठीला मानाचे स्थान द्या !
हिंदूंनो, हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करूया !