Saniur Rahman Bangladeshi Infiltrator : हिंदु बनून महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारा निघाला बांगलादेशी घुसखोर !

  • गेल्या ११ वर्षांपासून सनीउर रहमान हा ‘सत्यनिष्ठ आर्य’ नाव धारण करून उत्तराखंडात करत होता वास्तव्य !

  • हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये होत असे सहभागी !

ऋषिकेश (उत्तराखंड) – कपाळावर टिळा लावून आणि स्वतःचे सत्यनिष्ठ आर्य असे हिंदु नाव सांगून मदर मेरी आणि महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारी व्यक्ती बांगलादेशी घुसखोर असल्याचे पोलीस अन्वेषणात निष्पन्न झाले. सनीउर रहमान असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ‘द लल्लनटॉप’ या संकेतस्थळावर याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

चर्च में बदतमीजी करने वाला Satyanishth Arya निकला बांग्लादेशी Saniur Rahman, पुलिस ने कैसे पकड़ा?

 (सौजन्य : The Lallantop)

या वृत्तानुसार वर्ष २०२५ मधील नाताळच्या निमित्ताने रहमान याने चर्चच्या पाद्रयाशी गैरवर्तन केले होते. रहमान हा बांगलादेशातील बैसडी मधुखाली फरीदपूरचा रहिवासी असून तो वर्ष २०१६ पासून ऋषिकेशमध्ये सत्यनिष्ठ आर्य हे खोटे नाव धारण करून रहात असल्याचे उघड झाले आहे. १८ एप्रिलला ऋषिकेश पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत पडताळणी मोहीम राबवली. या वेळी पोलिसांना रहमानचा संशय आल्यावर त्यांनी त्याची चौकशी केली असता सत्य समोर आले.

चौकशीत असे समजले की,

सनीउर रहमान हा अटकेच्या एक दिवस आधीच लक्ष्मण झुला परिसरात आला होता. त्यापूर्वी तो देहली, गाझियाबाद आणि बंगाल यांसह अनेक ठिकाणी राहिला होता. त्याने नेपाळमार्गे भारतात घुसखोरी केली होती. त्याच्याकडे बांगलादेशी पारपत्र सापडले असून त्याची वैधता वर्ष २०१८ मध्येच संपली आहे. तो लोकांकडून देणगीही गोळा करत होता. तो सामाजिक माध्यमांवर सक्रीय होता. सत्यनिष्ठ आर्य या नावाने तो व्हिडिओ पोस्ट करायचा. ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले जायचे. त्यानंतर तो हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मुसलमान आणि ख्रिस्ती धर्माविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करत असे. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या वेळी त्याने गाझियाबादमधील एका चर्चमध्ये घुसून तेथील एका पाद्रयाशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. पोलीस आणि इतर अन्वेषण यंत्रणा रहमानविषयी अधिक माहिती गोळा करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात ‘सर तन से जुदा’चा फतवा काढणार्‍या इस्लामी संघटना आता या घुसखोर मुसलमानाच्या विरोधात फतवा काढणार का ? कि तो मुसलमान आहे; म्हणून हा अवमान सहन करणार ?
  • या माध्यमातून सनीउर रहमान याने हिंदुत्वनिष्ठांची किती माहिती आतंकवाद्यांकडे पोचवली, याचेही अन्वेषण झाले पाहिजे. तसेच अशा प्रकारे हिंदु नाव धारण करणार्‍या मुसलमानांचा नवा जिहादच समोर येत आहे, असेच म्हटले पाहिजे. किती हिंदू अशा प्रकारच्या षड्यंत्राला तोंड देण्यासाठी सिद्ध आहेत ?