वर्ष ७११ पासून चालू असलेल्या जिहादच्या षड्यंत्राविषयी हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी जनजागृती अभियान राबवणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात जनजागृती अभियान’ या विषयावर मुंबई येथे विशेष संवाद !

डावीकडून बोलतांना श्री. रमेश शिंदे, अधिवक्त्या (सौ.) प्रीती राऊत आणि सौ. धनश्री केळशीकर

मुंबई – भारतात शरीयतनुसार इस्लामिक शासन नसल्याने ही इस्लामिक शक्तींसाठी काफिरांची भूमी आहे. त्यांना भारतात ‘दार उल् इस्लाम’ (इस्लामचे शासन चालते, असा प्रदेश) म्हणजे इस्लामचे शासन आणायचे असून त्यासाठी चालू केलेल्या जिहादला ‘गझवा-ए-हिंद’ (भारताचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र) संबोधले असून भारताला ‘खुरासान’ (उत्तर पूर्वी इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उजबेकिस्तान या देशांचा भूप्रदेश) हे नाव केव्हाच दिले आहे. हिंदूंच्या विरोधात जिहाद अनेक वर्षांपासून चालू आहे; मात्र नाशिक येथील टी.सी.एस्. येथील धर्मांतराच्या प्रकरणामुळे ‘व्यावसायिक जिहाद’ काल-परवाच चालू झाला आहे’, असे हिंदूंना वाटत आहे. वर्ष ७११ पासून महंमद बिन कासिमने आक्रमण केले, तेव्हापासून नियोजनबद्ध रितीने जिहादचे षड्यंत्र चालू झाले आणि ते आजही चालूच आहे. याविषयी हिंदूंमध्ये जागृती नसल्याने जिहादविरोधात हे अभियान चालू केले आहे, असे विधान हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

ते मुलुंड येथील पद्मावती बँक्वेट सभागृहात २६ एप्रिल या दिवशी ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात जनजागृती अभियान’ या विषयावर आयोजित केलेल्या विशेष संवादात बोलत होते. या वेळी हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्त्या (सौ.) प्रीती राऊत आणि सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या वेळी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठ आणि युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सांगता प्रश्नोत्तर सत्र आणि संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने झाली.

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले,

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

१. वर्ष ७११ महंमद बिन कासीमचे आक्रमण करून हिंदु राजा दाहिरच्या मुलींचे अपहरण केले, तेव्हापासून ‘लव्ह जिहाद’ चालू झाला. त्यानंतर गझनी, घोरी, बाबर, अकबर यांनी आक्रमणे केली. केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिलांचा सन्मान आणि सुरक्षा प्रदान करण्यात आली; मात्र त्यानंतर १९४७ च्या वेळी झालेली देशाची फाळणी, वर्ष १९७१ मध्ये झालेली बांगलादेशची निर्मिती, १९९० मध्ये काश्मीरमध्ये झालेला हिंदूंचा नरसंहार, हिंदु महिला आणि युवती यांच्यावर झालेले अत्याचार तेव्हापासून आतापर्यंत चालूच आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मुसलमान अभिनेत्यांनी हिंदु अभिनेत्रींशी विवाह करून एक प्रकारे जिहादला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे जिहाद हा काही आताच उघड झालेला नाही, तर तो अगोदरपासूनच चालू आहे, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे.

२. धर्मांतरबंदी कायद्यामध्ये गुजरात सरकारने केलेल्या प्रावधानानुसार एखादी मुलगी परधर्मातील पुरुषासमवेत विवाह करण्यास इच्छुक असेल, तर त्यांना ९० दिवस अगोदर आई-वडिलांना सांगून त्यांच्याकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे लागेल. महाराष्ट्र सरकारनेही हे पाऊल उचलावे.

३. केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या (‘एन्.सी.आर्.बी. – ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’च्या) अहवालानुसार देशभरात वर्ष २०१६ ते २०२१ या कालावधीत ४ लाख ६५ सहस्रांहून अधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत. यांतील सर्वाधिक मुली महाराष्ट्रातून गायब झाल्या आहेत. आज माझी मुलगी सुरक्षित आहे; मात्र ती उद्या सुरक्षित असेल कि नाही ?, याची चिंता केली पाहिजे.

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘बेटी बचाओ’ (मुली वाचवा) अभियान !

गेल्या अनेक वर्षांपासून लव्ह जिहादचे प्रकार चालू आहेत. हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’च्या शिकार होऊ नयेत, यासाठी आम्ही ‘बेटी बचाओ अभियान’ चालू करत आहोत. हिंदूंनीही या अभियानात सहभागी व्हावे, याविषयी जनजागृतीसाठी आयोजित करण्यात येणारी व्याख्याने आणि उपक्रम यांसाठी आम्ही सहकार्य करू, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

‘कॉर्पोरेट जिहाद’च्या प्रकरणात साहाय्य करणारी यंत्रणा आणि लोक यांनाही गुन्ह्याच्या श्रेणीत आणून शिक्षा केली पाहिजे  ! – अधिवक्त्या (सौ.) प्रीती राऊत, हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक कार्यकर्त्या

आज हिंदु युवती लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या शिकार होत आहेत. ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या प्रकरणात साहाय्य करणारी यंत्रणा आणि लोक यांनासुद्धा गुन्ह्याच्या श्रेणीत आणून शिक्षा केली पाहिजे; मात्र ‘यापूर्वीचे आणि आताचे सरकार यांच्यामध्ये जिहाद रोखण्याविषयी गांभीर्य नाही’, असे खेदाने म्हणावे लागते. सरकारने ठरवले, तर याची पाळेमुळे नष्ट ते करू शकतात; मात्र तसे होतांना दिसत नाही. हिंदूंना असे संघटित व्हावे लागेल की, कुठलेही सरकार असले, तरी हिंदूंचे ऐकावे लागेल. या देशात हिंदू ८० टक्के आहेत. अन्य २० टक्क्यांसाठी हिंदूंना या देशात दाबले जात आह. हे थांबवले पाहिजे. हिंदूंनी जे गमावले आहे, ते परत मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंदु महिला आणि युवती यांना लक्ष्य केले जात आहे. हिंदु युवतींनी शारीरिक, मानसिक आणि ज्ञानाच्या दृष्टीने सशक्त अन् समर्थ बनले पाहिजे आणि अत्याचारांविरोधात कृतीशील झाले पाहिजे.

हे ही पहा →

येणार्‍या पिढीला वाचवायचे असेल, तर मुलांना धर्मशिक्षण दिले पाहिजे ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था  

टी.सी.एस्. प्रकरणी प्रसारमाध्यमांनी ‘असे काही घडले नाही’, अशी वृत्ते प्रसारित करून समाजाची दिशाभूल केली आहे. कॉर्पोरेट जिहाद, लव्ह जिहाद करणे एवढेच धर्मांधांचे ध्येय नसून वर्ष २०४७ मध्ये भारताचे इस्लामिक राष्ट्र करणे, हे त्यांचे ध्येय आहे. आमची मुले-मुली कुणासमवेत जात आहेत ?, याविषयी पालकांनी सजग रहाणे आवश्यक आहे. येणार्‍या पिढीला वाचवायचे असेल, तर मुलांना धर्मशिक्षण दिले पाहिजे.