अन्य धार्मिक ग्रंथ आणि सनातनचे ग्रंथ यांचे तौलनिक महत्त्व !

२३.४.२०२६ या दिवशी ‘जागतिक ग्रंथ दिवस’ आहे. त्या निमित्ताने ...

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रश्न :

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘सनातनच्या ग्रंथांचा लाभ वेद, उपनिषदे, गीता, ज्ञानेश्वरी, यांसारख्या धर्मग्रंथांच्या तुलनेत किती असेल ?’

सुश्री (कु.) मधुरा भोसले

उत्तर :

२. सुश्री मधुरा भोसले :

२ अ. अन्य धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथांचे वैशिष्ट्य : ‘वेद, उपनिषदे, गीता, ज्ञानेश्वरी, यांसारख्या धर्मग्रंथांतून धर्मशास्त्राविषयी पुष्कळ तात्त्विक माहिती मिळते. त्यामुळे या ग्रंथांचा अभ्यास करणार्‍या जिज्ञासू व्यक्तीला धर्मज्ञान मिळून तिचा धार्मिक पाया सिद्ध होतो.

२ आ. सनातनच्या ग्रंथांची वैशिष्ट्ये : सनातन संस्थेने संकलित आणि प्रकाशित केलेल्या विविध ग्रंथांत धर्मशास्त्र अन् अध्यात्मशास्त्र यांच्या तात्त्विक माहितीसह प्रायोगिक ज्ञानही समाविष्ट केले आहे. त्यामुळे या ग्रंथांचा अभ्यास करणार्‍या जिज्ञासूंना ‘नेमकेपणाने धर्माचरण आणि काळानुसार साधना कशी करायला हवी ?’, याचे सुरेख मार्गदर्शन लाभते. त्याचप्रमाणे सनातनच्या ग्रंथांमध्ये विविध विषयांवर केलेले संशोधन अंतर्भूत असल्यामुळे धर्म आणि अध्यात्म हे विषय बुद्धीच्या स्तरावरही नीट समजण्यास साहाय्य होते. या ग्रंथांमध्ये साधकांना आलेल्या अनुभूतीही अंतर्भूत केलेल्या आहेत. त्यामुळे ग्रंथांच्या वाचकांच्या मनात धर्माचरण आणि साधना यांवरील विश्वास अन् श्रद्धा निर्माण होण्यास साहाय्य होते. सनातनच्या अनेक ग्रंथांमध्ये पृथ्वीवर उपलब्ध नसलेले नावीन्यपूर्ण ईश्वरी ज्ञानही समाविष्ट केले आहे. त्यामुळे वैज्ञानिक परिभाषेसह ‘काळानुसार धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांनुसार कसे आचरण करायचे ?’, हे समजते अन् त्यासाठी प्रेरणा मिळते.

२ इ. भगवंताने काळानुसार ऋषिमुनी आणि सनातन संस्था यांच्या माध्यमातून विविध धर्मग्रंथांची निर्मिती केलेली असणे : अन्य धार्मिक ग्रंथ हे सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग, तसेच कलियुगाच्या प्रारंभीच्या ५ सहस्र वर्षांसाठी अत्यंत पूरक आहेत. या ग्रंथांतील ज्ञान प्रामुख्याने ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, शक्तिपातयोग आणि हठयोग, या मार्गांनी साधना करणार्‍या साधकांसाठी पूरक आहे, तर सनातन संस्थेने संकलित केलेले विविध ग्रंथ हे प्रामुख्याने ‘भक्तीयोगांतर्गत उपासनाकांड आणि गुरुकृपायोग या साधनामार्गांनी कलियुगात व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीनुसार तिने कोणती साधना करायला हवी ?’, याविषयी मार्गदर्शन करणारे आहेत. त्यामुळे हे ग्रंथ जिज्ञासूंसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. परिणामी सनातनचे ग्रंथ हे कलियुगाच्या अंतापर्यंत धर्माचरण आणि साधना यांसाठी समस्त जिज्ञासूंना प्रेरणादायी ठरणार आहेत. अशा प्रकारे भगवंताच्या प्रेरणेने सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग, या युगांसाठी ऋषिमुनींनी विविध ग्रंथांची निर्मिती केली होती, तर सनातन संस्थेवर भगवंताची कृपा झाल्याने कलियुगासाठी नावीन्यपूर्ण ज्ञानावर आधारित असणार्‍या सनातनच्या ग्रंथसंपदेची निर्मिती झालेली आहे.

२ ई. अन्य धार्मिक ग्रंथ आणि सनातनचे ग्रंथ यांची तुलना !

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

२ उ. सनातन संस्थेची ग्रंथसंपदा ही कलियुगातील ‘ज्ञानसंजीवनी’ असणे : सनातनची ग्रंथसंपदा ही कलियुगातील ‘ज्ञानसंजीवनी’ आहे. त्यामुळे सनातनचे ग्रंथ हे मूलाधार ग्रंथ आहेत. ‘कलियुगातील रज-तमप्रधान वातावरणातही जिवाने मुक्ती आणि मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी नेमकी कोणती व्यष्टी अन् समष्टी साधना करायला हवी ?’, याविषयी सनातनच्या ग्रंथांमध्ये सुरेख विवेचन केले आहे.’

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १०.४.२०२६, वेळ : दुपारी ४ ते ४.१५, कालावधी : १५ मिनिटे)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.