ब्रिटनच्या खासदार केटी लॅम यांची मागणी
(‘ग्रूमिंग गँग्स’ म्हणजे मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणार्या टोळ्या)

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या हुजूर (कंझर्व्हेटिव्ह) पक्षाच्या खासदार केटी लॅम यांनी देशातील ग्रूमिंग गँग्सची राष्ट्रीय स्तरावर चौकशीची मागणी केली आहे. पाकिस्तानी वंशाच्या काही ब्रिटीश मुसलमान टोळ्यांनी १९९० च्या दशकापासून २०१० च्या दशकापर्यंत मुलींचे (विशेषतः श्वेतवर्णीय आणि शीख मुलींचे) सतत लैंगिक शोषण केले. यामुळे देशातील रोदरहॅम, रोचडेल आणि टेलफोर्ड या शहरांमधील लोकांचे जीवन वाईट रितीने प्रभावित झाले.
‘खालसा वॉक्स’ वृत्तसंकेतस्थळाच्या एका अहवालानुसार गुन्हेगार ११ वर्षांइतक्या लहान मुलींना उद्याने, बस स्थानके किंवा शाळ यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी लक्ष्य करत असत. ते त्यांना गोड बोलून, दारू, अमली पदार्थ किंवा छोट्या भेटवस्तू यांच्या माध्यमातून जाळ्यात ओढत असत. हळूहळू विश्वास संपादन करून त्याचे रूपांतर दबाव आणि दहशतीत करत असत. पीडित मुलींना सदनिका किंवा दुकान यांमध्ये नेले जात असे. तिथे अनेक लोक त्या मुलीचे वारंवार लैंगिक शोषण करत असत. त्यांना धमकावले जात असे की, जर त्यांनी काही सांगितले, तर मारहाण केली जाईल, घर जाळले जाईल किंवा त्यांचे खासगी व्हिडिओ इंटरनेटवर प्रसारित केले जातील.
🚨 “Conduct a national inquiry into Grooming Gangs” – British MP Katie Lam demands answers.
The UK scandal exposed organised child exploitation networks that preyed on vulnerable girls in places like Rotherham, Rochdale & Telford from the 1990s to 2010s.
This is a clear example… https://t.co/PToMGxW7u3 pic.twitter.com/WW0FmDvdiY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 16, 2026
ग्रूमिंग गँग्सचा हैदोस आणि भयावह वास्तव
अहवालात नमूद केले आहे की, रोदरहॅममध्ये वर्ष १९९७ ते २०१३ या काळात सुमारे १ सहस्र ४०० पीडितांची प्रकरणे समोर आली, जी या समस्येची भीषणता दर्शवतात. यातील अनेक मुली दुर्बल कौटुंबिक परिस्थिती असलेल्या किंवा काळजी केंद्रांमध्ये रहाणार्या होत्या. टॅक्सीचालकांसारखे लोक, ज्यांना त्यांच्या दिनचर्येची माहिती होती, ते त्यांना सहज लक्ष्य करत असत. अनेक आरोपी चालक किंवा दुकान यांमध्ये काम करणार्या सामान्य लोकांसारखे दिसत असत आणि रात्री उघडपणे गुन्हे करत असत.
रोदरहॅममध्ये अनेक वर्षे हे शोषण चालू राहिले आणि वर्ष १९९१ पासूनच त्याबद्दलच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले गेले. आता ‘ऑपरेशन स्टोव्हवूड’ नावाचे ऑपरेशन राबवून चालू केलेल्या चौकशीत १ सहस्र १०० पेक्षा अधिक पीडितांची ओळख पटली असून त्याचे खटले वर्ष २०२७ पर्यंत चालतील.
विविध शहरांमधील गुन्हे आणि शिक्षा
१. रोचडेल शहरामध्ये वर्ष २०१२ मध्ये ९ जणांना लहान मुलींच्या तस्करीसाठी दोषी ठरवण्यात आले होते. अहवालात असे सांगितले गेले की, एका मुलीचे एका रात्रीत २० जणांनी लैंगिक शोषण केले. वर्ष २०२५ मध्ये आणखी ७ जणांना शिक्षा झाली, ज्यांना एकत्रितपणे १७४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली.
२. अहवालानुसार १९७० च्या दशकापासून टेलफोर्ड शहरामध्ये गरिबीमुळे सुमारे १ सहस्र मुलींना लक्ष्य करण्यात आले. ऑक्सफर्डमध्ये ‘ऑपरेशन बुलफिंच’ अंतर्गत १९९८ ते २०१२ या काळात झालेल्या प्रकरणांमध्ये २२ जणांना शिक्षा झाली.
३. हडर्सफिल्डमध्ये २० जण ११ वर्षांपर्यंतच्या मुलींवर १२० पेक्षा अधिक वेळा बलात्कार केल्याच्या प्रकरणी दोषी आढळले, तर न्यूकॅसलमध्येही अशी अनेक प्रकरणे समोर आली. ग्रेटर मँचेस्टरच्या आकडेवारीनुसार समूहाने केलेल्या शोषणाच्या ५२ टक्के प्रकरणांमध्ये आशियाई, विशेषतः पाकिस्तानी वंशाचे लोक सहभागी होते.
शीख समुदायाचा पुढाकार !
अहवालात असेही नमूद केले आहे की, यावर्षी हाऊन्सलो येथे शीख समुदायाच्या २०० लोकांनी मिळून १६ वर्षांच्या एका शीख मुलीची सुटका केली, जिला एका ३४ वर्षांच्या पाकिस्तानी व्यक्तीने ओलीस ठेवून तिचे लैंगिक शोषण केले होते. ‘पोलिसांनी वेळेवर कारवाई केली नव्हती’, असे सांगण्यात आले. ‘जेव्हा संस्था काम करत नाहीत, तेव्हा लोक स्वतः पुढे येऊन साहाय्य करतात’, हेच ही घटना दर्शवते.
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद
दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman