६० टक्के वारकरी ‘धर्मांध’ असल्याचा जावईशोध !

मुंबई – राजकारणात नेहमीच सोयीची भूमिका घेणारे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता वारकरी संप्रदायावर चिखलफेक केली आहे. एका महिला शासकीय अधिकार्यांच्या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत लिहिलेल्या लेखात त्यांनी वारकरी संप्रदायात ‘प्रतिगामी’ विचारांची घुसखोरी झाल्याची मुक्ताफळे उधळली आहेत. या संप्रदायातील ६० टक्के लोकांची मांडणी ‘धर्मांध शक्तीं’ना (इथे त्यांना हिंदुत्वनिष्ठ असे अभिप्रेत आहे) बळ देणारी आहे, अशी जातीयवादी वक्तव्ये करत त्यांनी वारकरी परंपरेला अपर्कीत करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘समता आणि प्रबोधन यांचा संदेश देणार्या वारकरी चळवळीमध्ये अशा विचारांची वाढ होणे, ही चिंताजनक गोष्ट आहे’, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. (पवारांना कदाचित् ‘पुरोगामी’ कीर्तनकार आणि ‘राजकीय’ प्रवचनकार’ हवे असू शकतात. त्यांनी वारकरी संप्रदायावर केलेली टीका ही निव्वळ वैचारिक नसून ती राजकीय हेतूने प्रेरित आहे. ज्या वारकरी संप्रदायाने शतकानुशतके ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ असे म्हणत समाजाला एकत्र ठेवले, त्यांना ‘प्रतिगामी’ ठरवण्याचे धाडस पवार कसे करू शकतात ? – संपादक)
🚨 Attack on Warkari Sampraday🚨
“‘Regressionist’ thoughts have infiltrated the Warkari Sampraday!” – Sharad Pawar
❗ Shockingly, claims are being made that 60% of Warkaris are ‘bigoted’
🚩 Hindus must unite to protect the sanctity of the Warkari Sampraday and resist political… pic.twitter.com/5eIw2gN2j7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 11, 2026
पुरोगामी विचारांची पोषक मांडणी करणार्या ४० कीर्तनकारांची नोंद घेतली असून ‘अशाच ‘पुरोगामी’ विचारांच्या कीर्तनकारांची संख्या वाढणे आवश्यक आहे’, असे म्हटले. ‘वारकरी चळवळीत महिलांचा अभाव आहे. प्रबोधनाच्या या प्रवाहात महिलांचा सहभाग फारसा दिसत नाही, ही गोष्ट दुर्दैवी आहे. समाजातील सर्व घटकांचा समतोल सहभाग असणे आवश्यक आहे’, असेही त्यांनी नमूद केले. (वारकरी संप्रदायाला स्त्री संतांची मोठी परंपरा लाभली आहे. ‘वारकरी संप्रदायात महिलांचा सहभाग नाही’, हे जाणीवपूर्वक केलेले खोडसाळ विधान आहे ! – संपादक)
|

मुंबई – इफ्तार मेजवान्यांत सहभागी होतांना खासदार शरद पवार यांना धर्मांधता दिसत नाही; मात्र ‘राम कृष्ण हरि’चा गजर करणार्या वारकर्यांमध्ये त्यांना धर्मांधता का दिसते ? हिंदु धर्म आणि वारकरी संप्रदाय यांविषयी नकारात्मक भूमिका घेणार्या पवारांना आता हा ‘संप्रदाय’ धर्मांध वाटू लागला आहे. काही लोकांची सूची सिद्ध करून त्यातून संप्रदायाला विभाजित करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा कोणत्याही प्रयत्नांना आम्ही जिवंत असेपर्यंत यशस्वी होऊ देणार नाही, अशी चेतावणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख श्री. तुषार भोसले यांनी दिली आहे.
- नवनाथ बन, मुख्य प्रवक्ते, भाजप – वारकरी संप्रदायात धर्मांधता नाही, तर काही ‘शहरी नक्षलवादी’ घटक घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. याविषयी पवारांनी त्यांच्या संशोधन पथकाद्वारे स्पष्ट माहिती द्यावी. विठ्ठलभक्ती आणि प्रबोधन यांना धर्मांधतेशी जोडणे हा वारकरी परंपरेचा मोठा अवमान आहे.
- ह.भ.प. गणेश महाराज शेटे – वारकरी परंपरा ही सनातन धर्माचाच अविभाज्य भाग आहे. हिंदु धर्मावर आघात करणार्या कोणत्याही गोष्टीचा वारकरी समाज प्राणपणाने निषेध करेल.
- ह.भ.प. विठ्ठल पाटील, अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद – पवारांनी ज्या ४० कीर्तनकारांची सूची सिद्ध केली आहे, ती त्यांनी त्वरित घोषित करावी. ‘कुणाचे कीर्तन ऐकायचे आणि कुणाचे नाही, कुणाला बोलवायचे आणि कुणाला टाळायचे’, हे लोकांना स्पष्ट होईल.
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
पुण्यात श्री निवडुंगा विठोबा देवस्थान येथे पालखी सोहळ्याची जय्यत सिद्धता !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court