‘हात कातरो खांब’ हे नाव चुकीचे वाटत असल्याने संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावाचा विरोध शारजाह येथील ‘ग्लोबल स्टडीज युनिव्हर्सिटी’चे डेल लुईस मेनेझिस यांनी केला आहे. ‘हात कातरो खांब नामकरणाला पुष्टी देणारा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही’, असे त्यांचे म्हणणे आहे. पाडलेल्या एकूण देवळांपैकी काही देवळांचे पुरावे आहेत (तेही अभिमान म्हणून ठेवलेले); म्हणजे ज्यांचे पुरावे नाहीत ती पाडलीच नाहीत, असे म्हणायचे का ? ते इतर आणि अन्य संदर्भावरून ठरवावे लागते.

१. ‘हात कातरो खांब’चा संदर्भ आणि स्पष्टीकरण
अनेक अभ्यासकांच्या मते ज्याला ‘हात कातरो खांब’ म्हटले जाते, तो स्तंभ पोर्तुगिजांनी एका प्राचीन मंदिरातून आणला आणि त्याचा वापर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी ‘पिलोरी’ (Pillory) म्हणून केला. पोर्तुगीज त्याला ‘पेलोरिन्हो नोवो’ (Pelourinho Novo) म्हणत असत. पोर्तुगीज कायद्यात ‘पिलोरी’ हे नगरपालिकेच्या अधिकारक्षेत्राचे आणि न्यायाचे प्रतीक असायचे. त्यामुळे जरी तो स्तंभ मूळचा सार्वजनिक क्षेत्राची खूण असला, तरी पोर्तुगिजांनी त्याचा वापर शिक्षा देण्यासाठीच केला.
अ.का. प्रियोळकर यांच्या ‘The Goa Inquisition’ (१९६१) या मूळ इंग्रजी पुस्तकात ‘हात कातरो खांबा’चा थेट उल्लेख परिशिष्टात (Appendix) किंवा पुस्तकातील चित्रांच्या स्पष्टीकरणात प्रामुख्याने आढळतो. संदर्भ : प्रकरण ९ (Use of Torture by the Inquisition) पान १५० – १६०.‘हात कातरो खांबा’चा उल्लेख विशेषतः पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या चित्रांच्या सूचीत (List of Illustrations) किंवा परिशिष्टातील टीपांमध्ये (पान २९०-२९८) किंवा इन्क्विझिशनच्या शिक्षेच्या साधनांच्या वर्णनासह अधिक स्पष्टपणे येतो.
२. पोर्तुगीज काळातील गुन्हेगार संकल्पना आणि त्यांना दिल्या जाणार्या शिक्षा

हे सर्व पहातांना गुन्हेगार म्हणजे काय, हे समजून घेणे आवश्यक आहे. पोर्तुगीज कॅथोलिक चर्चने आजवर राबवलेल्या सर्व मोहिमांपैकी गोव्यातील ‘इन्क्विझिशन’ हा हिंदु आणि मुसलमान यांच्यावर केलेला सर्वांत हिंसक नरसंहार आहे. या इन्क्विझिशनमध्ये एक न्यायाधिकरण होते, ज्याचे प्रमुख पोर्तुगालहून पाठवलेले एक न्यायाधीश आणि त्यांचे दोन साहाय्यक किंवा हस्तक असत. तो न्यायाधीश लिस्बनखेरीज कुणालाही उत्तरदायी नव्हता आणि त्याला योग्य वाटेल, तसे तो निकाल देत असे. हे इन्क्विझिशन ‘व्हडलें घर’ (सांता कासा – Santa Casa – पवित्र घर) किंवा ‘पालासियो दो इन्क्विझिसाओ” (Palácio do Inquisição) नावाने ख्यात; पण मूलत: विजापूरचा सुलतान युसूफ आदिलशाह याच्या राजवाड्यात चालवले जात असे. वर्ष १५५४ पर्यंत हे ठिकाण गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरचे निवासस्थान होते. कैद्यांसाठी २०० कोठड्या आणि ‘काफिर अन् मूर्तीपूजक’ हिंदूंच्या शरिरावर सर्व प्रकारचे अत्याचार करण्यासाठी छळाची साधने बसवण्यासाठी यात फेरपालट करण्यात आले होते, जेणेकरून विरोध करणार्यांवर ख्रिस्ती धर्माचा ‘सच्चा आणि दयाळू पंथ’ लादता येईल. सर्व चौकशी बंद दाराआड केली जात असे; परंतु पुरुष, स्त्रिया आणि मुले यांच्या वेदनादायक किंकाळ्या रस्त्यावरून अगदी मध्यरात्रीही ऐकू येत असत; कारण त्यांच्या नातेवाईकांसमोरच त्यांना निर्दयीपणे फटके मारले जात, मारहाण केली जात असे, जाळले जात किंवा हळूहळू त्यांचे अवयव तोडले जात असत.
हे तथाकथित गुन्हे, म्हणजे अनेकदा ख्रिस्ती पंथाविरुद्ध केलेली निंदा, मूर्तीपूजा आणि ख्रिस्ती पंथाविरोधात जाणारी कोणतीही गोष्ट असे.
२ अ. गुन्ह्यांसाठी केल्या जाणार्या शिक्षा आणि त्यासाठीचे संदर्भ : या ‘गुन्ह्यांसाठी’ त्यांना अनेकदा खांबाला बांधून जिवंत जाळले जाई; पण त्याआधी त्यांचा प्रचंड छळ केला जात असे. जर त्यांनी स्वतःचे गुन्हे मान्य केले, तर त्यांना प्रथम गळा दाबून मारून आणि नंतर मृत्यूनंतर जाळून ‘ख्रिस्ती दया’ दाखवली जात असे. या छळाच्या सत्रांवर ख्रिस्ती धर्मगुरूंद्वारे कार्यक्षमतेने देखरेख ठेवली जात असे.
काही छळांमध्ये हात पाठीमागे बांधून मनगटापासून टांगले जाणे समाविष्ट होते. कैदी तिथे घंटोन्घंटे लटकत राही आणि अचानक भूमीजवळ खाली पाडले जाई, ज्यामुळे खांदे सांध्यातून निखळले जात असत. याखेरीज ‘वॉटर टॉर्चर’ही होता, ज्यामध्ये लोखंडी सळईवर झोपवून सतत पाणी पिण्यास भाग पाडले जाई. यामुळे लोखंडी सळईमुळे पाठीचा कणा मोडत असे आणि उलट्या होऊन गुदमरल्यासारखे होत असे. कधी कधी त्या स्थितीत पोट पाण्याने भरलेले असतांना काठ्यांनी इतके मारले जाई की, पोटच फाटत असे. आगीद्वारे छळ करतांना आगीवर टांगून जिवंत भाजले जाई, ज्यामध्ये पायांना प्राण्यांची चरबी लावली जाई, जी पेट घेऊन पाय जाळून टाकत असे.
हे सर्व जोपर्यंत पीडित व्यक्ती गुन्हा मान्य करत नाही, तोपर्यंत केले जाई. मग त्यांना त्यांच्या कोठडीत नेले जाई आणि फाशीची वेळ येईपर्यंत तडफत ठेवले जाई. इतर साधनांमध्ये धातूचा हातमोजा समाविष्ट होता, ज्यामध्ये हात आगीवर भाजला जात असे आणि पाय अन् नडगी तोडण्याची साधने, रॅकवर माणसाची आतडी बाहेर काढणे, कान कापण्यासाठी तीक्ष्ण चाकू किंवा स्त्रीचे स्तन शरिरापासून वेगळे करणारी साधने इत्यादींचा समावेश होता. हे सर्व ख्रिस्ती पंथाचे ‘दया’ दाखवण्याचे आणि ख्रिस्ती न झाल्याकारणाने किंवा होऊनही हिंदु देव पूजल्यावर पश्चात्ताप करण्याचे मार्ग होते.

(संदर्भ १ : व्ही. सुंदरम यांच्या ’ॲट्रॉसिटीज् ऑन हिंदूज बाय मिशनरीज इन गोवा’ आणि संदर्भ २ : ‘फ्रॅगमेंट अबाऊट द इन्क्विझिशन’, अलेक्झांडर हर्कुलानो)
‘मुलांना त्यांच्या पालकांसमोर फटके मारले जात आणि हळूहळू त्यांचे अवयव कापले जात. पालकांनी काहीही चुकवू नये म्हणून त्यांच्या पापण्या कापल्या जात असत. शरिराचे भाग काळजीपूर्वक कापले जात, जेणेकरून केवळ धड आणि डोके उरले, तरी ती व्यक्ती शुद्धीवर राहील… अशा राक्षसी छळाचे पीडित असलेल्यांची संख्या सहस्रो होती अन् हे घृणास्पद प्रकार वर्ष १७७४ मधील एका संक्षिप्त विश्रांतीपर्यंत चालूच राहिले… हे अनिष्ट कार्य पुन्हा चालू झाले आणि आश्चर्याचे, म्हणजे १६ जून १८१२ पर्यंत चालू राहिले. त्या वेळी गोव्यात तैनात असलेल्या ब्रिटीश सैनिकांच्या उपस्थितीने आणि ब्रिटीश दबावाने हा आतंकवाद संपवला.’
(संदर्भ ३ : ‘एम्पायर ऑफ द सोल, सम जर्नीज इन इंडिया’ पॉल विल्यम रॉबर्ट्स)
‘इतिहासाची मोडतोड आणि लपवाछपवी होऊनही हे एक निर्विवाद सत्य आहे की, गोव्यातील लोकांचे ख्रिस्तीकरण हिंसेचा परिणाम म्हणून झाले. गोव्यात ख्रिस्ती पंथाचा प्रसार उपदेशांमुळे नव्हे, तर हिंसा आणि दबाव यांच्या पद्धतींमुळे झाला. या तथ्यासाठी पुराव्याची आवश्यकता असल्यास तो आपल्याला त्या काळातील स्थानिक राज्यकर्त्यांच्या कायद्याची पुस्तके, आदेश आणि अहवाल, तसेच ख्रिस्ती पंथाच्या अत्यंत विश्वसनीय कागदपत्रांमधून मिळू शकतो.’
(संदर्भ ४ : ‘द डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’, त्रिस्तांव ब्रागांझा कुन्हा.)
डॉ. गार्सिया द ओर्ता (Dr. Garcia de Orta) नवख्रिस्ती झालेले ज्यू होते. त्यांच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी त्यांच्यावर मरणोत्तर खटला भरला. त्यांना ‘पाखंडी’ (heretic) घोषित करून त्यांच्या थडग्यातून त्यांची हाडे बाहेर काढली गेली, ती सार्वजनिकरित्या फोडली गेली आणि नंतर ती जाळून त्यांची राख समुद्रात फेकण्यात आली. गार्सिया द ओर्ता यांची बहीण कॅटरिना द ओर्ता (Catarina de Orta) हिलाही त्याच कारणासाठी २५ ऑक्टोबर १५६९ या दिवशी खांब्याला बांधून (कदाचित् हात कातरो खांब असेल, नक्की ठाऊक नाही ) जिवंत जाळण्यात आले. (संदर्भ ५ : ‘The Goa Inquisition’ (१९६१), अ.का. प्रियोळकर)
३. पुरावे असतांना थोतांड म्हणणे कितपत योग्य ?
‘हा कितीही क्रूर आणि वाईट असला, तरी तो इतिहास आहे. त्याचा आजच्या ख्रिस्त्यांशी काहीही संबंध नाही आणि या सर्व गोष्टींसाठी आजचे ख्रिस्ती अजिबात उत्तरदायी नाहीत. कुणी त्यांना उत्तरदायी धरतही नाही; पण इतिहासात हे घडलेच नव्हते, ‘हात कातरो खांब’ हे हिंदुत्वनिष्ठांचे आणि ‘सामाजिक शांतता बिघडवणार्यांचे काम’, असले थोतांड कुणी ऐकवू नये.
४. गोव्यातील नरसंहाराविषयी चर्चा क्षमा मागणार नाही, हे सत्यच !
बहुतांश लोकसंख्या ख्रिस्ती होऊन किमान १० ते १५ पिढ्या ख्रिस्ती विचार भिनल्याखेरीज, चर्च केलेल्या कृत्यांची स्वीकृती देत नाही आणि क्षमाही मागत नाही, ही वस्तूस्थिती आहे. गोव्यात हिंदूंचा, मुसलमानांचा, ज्यूंचा जो नरसंहार केला, त्याची चर्च क्षमा मागणार नाही आणि स्वीकृतीही देणार नाही, हे सत्य आहे.
– श्री. प्रसन्न बर्वे, पणजी, गोवा. (४.४.२०२६)
(साभार : ‘प्रसन्नवदने’ ब्लॉग)
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
महिला रुग्णाकडून लाच घेतांना कामथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरला पकडले
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !