विदेशातील आतंकवाद्यांच्या संपर्कात राहून आतंकवादी कारवायांचे नियोजन केल्याचे प्रकरण

तुमकुरू (कर्नाटक) – विदेशातील आतंकवाद्यांशी सतत संपर्कात राहून अनेक आतंकवादी कारवायांचे नियोजन करणार्या तुमकुरू येथील श्रीरामनगरचा रहिवासी अल्ला बक्ष याला पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याने ‘एक्स’ खात्यावरून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा प्रकारे आतंकवाद्यांशी संभाषण केल्याचे समोर आले आहे. अल्ला बक्षच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार्या केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने पोलिसांना माहिती दिली होती.
या माहितीच्या आधारे तुमकुरू शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश यांच्या पथकाने अल्ला बक्षला अटक केली. त्याच्यासोबत आणखी एका साथीदाराच्या संपर्काची माहिती समोर आली आहे. अल्ला बक्षला अटक होताच दुसरा आरोपी पसार झाला आहे. या प्रकरणी तुमकुरू शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने अल्ला बक्षशी जवळचे संबंध असलेल्यांची माहिती गोळा केली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !