लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई !

चिपळूण – गर्भपात करण्यासाठी आवश्यक असणारे किट (गोळ्या) देण्यासाठी ४ सहस्र ५०० रुपयांची लाच घेतांना कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार (पागमळा, चिपळूण) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी पकडले.
१. कामथे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ डॉ. कांचन मदार यांच्याकडे ३ जून या दिवशी एक महिला रुग्ण आली होती. या महिलेला गर्भपात करायचा होता. त्यासाठी तिने डॉ. मदार यांची भेट घेतली.
२. गर्भपात करण्यासाठी आवश्यक असणारे किट (गोळ्या) हवे असेल, तर पैसे द्यावे लागतील, असे सांगून डॉ. मदार यांनी त्या महिलेकडे ४ सहस्र ५०० रुपयांची मागणी केली.
३. संबंधित रुग्ण महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली. रुग्ण महिला पैसे देण्यासाठी डॉ. मदार यांच्याकडे येणार होती. ठरलेल्या जागेवर पैसे देण्यात येणार होते. त्यानुसार सापळा लावून त्यांना पकडण्यात आले.
४. चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक परिसरात डॉ. मदार यांनी संबंधित रुग्ण महिलेला स्वतःच्या खासगी चारचाकी गाडीमध्ये घेतले. त्यांनी रुग्णाकडून ४ सहस्र ५०० रुपये घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी त्यांना पकडले.
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
भरारी पथक निर्माण करून गोहत्या आणि गोतस्करी नियंत्रणात आणणार ! – जिल्हा पोलीस अधीक्षकांची ग्वाही
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !