खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !

स्वत:ची ओळख ‘हिंदु’ असल्याचे भासवून चालवत आहे सौंदर्यप्रसाधनगृह !

मुंबई, ५ जून (वार्ता.) – नवी मुंबईतील खारघर येथे ‘हेअर स्पा’साठी (सौंदर्यवर्धनासाठी करण्यात येणारे केसांवरील उपचार) आलेल्या हिंदु महिलेच्या केसांवर उपचार करतांना डोळे बंद करायला सांगून समीर खान या मुसलमान युवकाने तिच्या ओठाचे चुंबन घेतले. या प्रकारानंतर हिंदु महिलेने तात्काळ केसांचे उपचार थांबवायला सांगितले. हिंदु महिलेने हा प्रकार पतीला सांगून खारघर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून समीर खान याला अटक केली.

खारघर येथील सेक्टर क्र. २ मधील ‘सीएम्सी सलून’मध्ये बहिणीच्या ओळखीच्या समीर खान याच्या सौंदर्यप्रसाधनगृहात ही हिंदु महिला केसांचे उपचार करण्यासाठी गेली होती. यानंतर उपचाराचे पैसे ऑनलाईन देऊन हिंदु महिला तेथून निघून गेली.

नाव ‘शमीम’; मात्र सांगतो ‘समीर’ !

हिंदु महिलेचा विनयभंग करणारा हा युवक स्वत:चे नाव ‘समीर’ असे सांगतो. हिंदु महिलेने ऑनलाईन पैसे पाठवल्यावर त्याचे नाव शमीम शकीर सलमानी असे नाव आले. याचा अर्थ ‘शमीम सलमानी’ स्वत:चे नाव ‘समीर’ असल्याचे म्हणजे ‘हिंदु’ असल्याचे भासवून सौंदर्यप्रसाधन चालवत आहे.

अन्य महिलांचा विनयभंग होऊ नये, यासाठी तक्रार ! – पीडित महिला

पीडित महिला ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाल्या, या प्रकारानंतर मला भीती वाटली; परंतु घडलेला प्रकार पतीला सांगितल्यावर त्यांनी मला ‘पोलिसांत तक्रार करूया’, असे सांगितले. माझ्यासमवेत जो प्रकार घडला तो अन्य युवती किंवा महिला यांच्यासमवेत घडू शकतो. असे होऊ नये, यासाठी पोलिसांत तक्रार करण्याचे मी धारिष्ट्य केले.

संपादकीय भूमिका

अनेक ठिकाणी अशा प्रकारे धर्मांध मुसलमान सौंदर्य उपचारांच्या नावाखाली हिंदु महिलांचे शोषण करत असतात ! त्यामुळे मुसलमानांच्या सौंदर्यवर्धनालयात जायचे का ?, हे हिंदु महिलांनी ठरवायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदु महिलांचे शोषण करणारी सौंदर्यवर्धनालये सुखनैव चालणे, हे कशाचे लक्षण आहे ?