Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्‍या असर महंमद यास अटक !

घरमालकाच्या सांगण्यावरून मंदिरात नमाजपठण केल्याने घरमालकाविरुद्धही गुन्हा नोंद !

मंदिरात नमाजपठण करताना असर महंमद

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथील ओलिना गावात एका हनुमान मंदिरात  नमाजपठण करणार्‍या असर महंमद याला पोलिसांनी नुकतीच अटक केली. याविषयीचा  व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. असर महंमद याच्यासह ३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू करण्यात आले आहे.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार नावाच्या व्यक्तीचे घर बांधण्याचे काम चालू होते आणि तिथे असर महंमद हा गवंडी म्हणून काम करत होता. दुपारी इतर कामगार जेवायला गेल्यावर असर महंमदने निर्माणाधीन (बांधकाम चालू असलेल्या) घरासमोर असलेल्या हनुमान मंदिरात नमाजपठण केले. राजकुमार याच्या सांगण्यावरूनच त्याने असे केले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकुमारविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण आहे.

संपादकीय भूमिका

असा कुठला मुसलमान कधी कुठल्या हिंदूला मशिदीत प्रार्थना करण्यास सांगतो का ? हिंदूंना धर्मशिक्षण आणि धर्माभिमान नसल्याने ते असे कृत्य करतात !