लखीमपूर खीरी (उत्तरप्रदेश) – लखीमपूर खेरी जिल्ह्यात गरीब, आजारी आणि असाहाय्य हिंदूंना चमत्काराचे आमीष दाखवून ख्रिस्ती बनवले जात असल्याचे उघड झाले आहे. भारत-नेपाळ सीमेजवळ कोणत्याही फलकाविना गुप्त चर्च चालवले जात आहेत.
पत्रकाराने कामगार बनून २० दिवसांत उघड केले गुपित !
‘दैनिक भास्कर’च्या वृत्तानुसार, हे मोठे जाळे उघड करण्यासाठी एका पत्रकाराने कामगाराचे रूप धारण केले. त्याने लखीमपूरमधील एका गावात २० दिवस शेतात काम केले. त्याने स्वतःला गरीब आणि आजारी असल्याचे भासवले. त्यानंतर स्थानिक लोकांनी त्याचा परिचय पाद्री विजय याच्याशी करून दिला. विजय मूळचा नेपाळचा रहिवासी असून तो बर्याच काळापासून येथे ‘गुप्त चर्च’ चालवत आहे.
गुप्त चर्चमध्ये बोलावले, सरकारी शिक्षकही सहभागी !
या पत्रकाराला एका गुप्त चर्चमध्ये नेण्यात आले. तिथे पाद्री विजय आणि त्याच्या साथीदारांनी पत्रकाराचा बुद्धीभेद करणे चालू केले. तेथे एक सरकारी शिक्षक आणि त्याची पत्नीही उपस्थित होते. त्यांनी दावा केला की, येशूला शरण आल्यामुळे त्यांची सर्व दुःखे दूर झाली आहेत. त्यांनी पत्रकाराला प्रतिदिन तेथे येण्यास सांगितले.
ब्लेडने कापला मनगटावरील दोरा !
पाद्रीने पत्रकाराच्या हातात बांधलेला लाल धार्मिक दोरा पाहिला. पाद्रीने सांगितले की, दोरा, ताबीज, गंगाजल आणि पूजा-पाठ यांसारख्या गोष्टी प्रार्थनेचा प्रभाव रोखतात. यानंतर पत्रकाराच्या मनगटावरील दोरा ब्लेडने कापून टाकण्यात आला. त्यांना हिंदु देवतांची पूजा सोडून देण्याचा सल्ला देण्यात आला.
गावोगावी पसरले आहे जाळे !
अन्वेषणात असे समोर आले आहे की, या जाळ्यातील लोक प्रत्येक गावात लपलेले आहेत. हे लोक अशा लोकांना शोधतात, जे अत्यंत गरीब किंवा आजारी आहेत. जसा एखादा अशा प्रकारचा परिवार सापडतो, तशी त्याची माहिती त्वरित पाद्र्यापर्यंत पोचवली जाते. त्यानंतर साहाय्य करण्याच्या बहाण्याने त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो.

तुर्भे रेल्वेस्थानकाजवळील पदपथांच्या सुधारणेचे काम चालू !
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दान चोरीनंतर मंदिराचे सरकारीकरण होण्याची शक्यता
बिदर (कर्नाटक) : महाहिंदु मेळाव्याला अनुमती मिळताच समाजकंटकांकडून श्रीरामाचा अवमान !
तुमच्याकडे वर्दी आहे; म्हणजे तुम्ही काहीही करू शकता का ? – Karnataka High Court
इस्लाम स्वीकारल्यास आपोआप ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जा मिळू शकत नाही ! : Madras High Court
कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !