|
नवी देहली – ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिलमध्ये मंगळ मीन राशीत गोचर करत असतांना तो शनीवर क्रूर दृष्टी टाकत आहे, ज्यामुळे संघर्षाचा योग निर्माण होतो. अशाच प्रकारचे ग्रहयोग वर्ष १९१७ चे पहिले महायुद्ध आणि १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध या काळात निर्माण झाले होते. त्यामुळे आताही तसेच ग्रहमान निर्माण झाल्याने तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता ज्योतिषांकडून वर्तवली जात आहे. शनि आणि मंगळ यांचा सामना मोठ्या रक्तपाताचे संकेत देत असल्याचे ज्योतिषांचे मत आहे. दुसरीकडे शनि आणि राहू यांची युती विनाशकारी मानली जाते आणि ती अण्वस्त्र वापराच्या शक्यतेकडे निर्देश करते, असा दावा केला जात आहे. तसेच सूर्याचा मेष राशीत प्रवेश मोठ्या देशांमधील सत्तासंघर्ष तीव्र करू शकतो, असेही म्हटले जात आहे. या संदर्भात ‘झी न्यूज’च्या संकेतस्थळावर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.
🚨 World War III fears in April? Astrologers warn of volatile planetary alignments 🌍⚠️
🔴 Saturn-Mars conjunction could lead to horrific bloodshed
☢️ Concerns raised over possible nuclear escalation
📅 Key dates: April 17-19 – “Highly sensitive period”
🗣️ Expert views:
•… pic.twitter.com/7r6Qb70Kd7— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 1, 2026
१७, १८ आणि १९ एप्रिल या दिवसांत मोठी घटना घडण्याची शक्यताज्योतिषीय गणनेनुसार १७, १८ आणि १९ एप्रिल या काळात ग्रहस्थिती अत्यंत संवेदनशील होईल आणि मोठी घटना घडू शकते, असे सांगितले जात आहे. |
हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये आणखी तणाव वाढणार ! – ज्योतिषाचार्य नीती शर्मा
ज्योतिषाचार्य नीती शर्मा यांच्या मते, शनि, राहू, मंगळ आणि केतु हे अशुभ ग्रह एकत्र आल्यास विनाशकारी घटना घडतात. सध्या शनि मीन राशीत असून ती हानी दर्शवणारी रास मानली जाते. मंगळ आणि राहू यांची युती स्फोटक परिस्थिती निर्माण करते. अग्नीतत्त्वाचा मंगळ आणि जलतत्त्व एकत्र आल्यास तीव्र संघर्ष संभवतो. यामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनी परिसरात तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.
२० ते २२ एप्रिल या काळात परिस्थिती अधिक तीव्र होईल ! – ज्योतिषाचार्य एम्.एम्. ठाकूर
ज्योतिषाचार्य एम्.एम्. ठाकूर यांच्या मते, शनी, सूर्य आणि मंगळ हे ३ ग्रह स्फोटक स्वरूपाचे मानले जातात. शनीचे मीन राशीत गोचर आणि मंगळाचा प्रवेश यांमुळे समुद्राशी संबंधित भागात हालचाली वाढू शकतात. २ एप्रिलपासून तणाव वाढण्याची शक्यता असून २० ते २२ एप्रिल या काळात परिस्थिती अधिक तीव्र होऊ शकते.
अण्वस्त्र आक्रमणाची शक्यता अत्यंत गंभीर ! – माजी राजनैतिक अधिकारी जे.के. त्रिपाठी
माजी राजनैतिक अधिकारी जे.के. त्रिपाठी यांच्या मते, अण्वस्त्र आक्रमणाची शक्यता अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि अशा परिस्थितीत मर्यादित आक्रमणेही मोठा परिणाम घडवू शकतात. वर्ष १९४५ नंतर अणूबाँबचा वापर झालेला नाही. सध्याचा संघर्ष आणखी वाढू शकतो आणि त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
नेतान्याहू यांना अमेरिकेचा पाठिंबा पुढे कितपत मिळेल, हे अनिश्चित ! – परराष्ट्र तज्ञ रोबिंदर सचदेवा
परराष्ट्र विषयातील तज्ञ रोबिंदर सचदेवा यांच्या मते, समुद्रकिनारी आणि सागरी भाग येथे संघर्ष अधिक दिसू शकतो. अमेरिका काही प्रमाणात मागे हटण्याच्या भूमिकेत असू शकते; मात्र इस्रायल दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी संघर्ष चालू ठेवू शकतो. नेतान्याहू यांना अमेरिकेचा पाठिंबा पुढे कितपत मिळेल, यासंदर्भात अनिश्चितता आहे.


‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin