
इस्लामाबाद (पाकिस्तान) – एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि एक भक्कम अमेरिका पाकिस्तानसाठी आवश्यक आहे, असे विधान पाकमधील अमेरिकेच्या राजदूत नताली ए. बेकर यांनी केले. त्या अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकी दूतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळी बेकर यांनी इराण युद्धात बजावलेल्या भूमिकेसाठी पाकिस्तानचे कौतुकही केले. त्या म्हणाल्या की, वर्ष १९७९ च्या इराणी क्रांतीनंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील सर्वांत उच्च स्तरीय चर्चेसाठी पाकिस्तान एप्रिलमध्ये एक केंद्र बनले होते.
"A strong Pakistan is essential for US interests," says US Ambassador Natalie A. Baker.
🌍👀 But the world is watching closely; is it really about American national interests, or is it about Trump's private business interests? #GeoPolitics #US #Pakistan #GlobalAffairs
PC:… pic.twitter.com/WoiyEjjOxU— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 6, 2026
बेकर पुढे म्हणाल्या की, २ विरोधी देशांमधील चर्चा सुलभ करण्यात पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावली. हा पाकच्या आधुनिक इतिहासातील सर्वांत शानदार क्षण आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मे २०२५ मध्ये झालेल्या युद्धविरामचे श्रेय पंतप्रधान शरीफ आणि सैन्यदलप्रमख मुनीर यांच्या नेतृत्वाला दिले. त्यांनी याला अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील युद्ध रोखण्यामध्ये एक मोठे योगदान असल्याचे सांगितले. पाकिस्तानच्या नेत्यांची समज, म्हणजेच तणाव अल्प करण्याची आणि धोकादायक संघर्ष शांत करण्याची इच्छा अमेरिका विसरली नाही. तिचे कौतुक केले जाते आणि यामुळे एक नवा अध्याय प्रारंभ झाला आहे. सप्टेंबरमध्ये हे नाते आणखीनच घट्ट झाले, जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ओव्हल कार्यालयात पंतप्रधान शरीफ आणि सैन्यदलप्रमुख मुनीर यांचे स्वागत केले.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण