अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे पुन्हा विधान

वॉशिंग्टन (अमेरिका) – मला तुमचे पंतप्रधान फार आवडतात. ते माझे चांगले मित्र आहेत आणि आमचे आपापसांत उत्तम जमते. आमचे संबंध फार चांगले आहेत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.
भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच व्यापार करार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारताने अमेरिकेचा अपलाभ घेतल्याचा आरोप !
अनेक वर्षे भारताने अमेरिकेचा अपलाभ घेतला. त्यांनी आमच्यावर प्रचंड आयातशुल्क लादले आणि स्वतः मात्र काहीच दिले नाही, असा आरोप ट्रम्प यांनी केला. ‘हार्ले डेव्हिडसन’ आस्थापनाला भारतात येऊ दिले जात नव्हते. त्यांनी त्यावर २०० टक्के कर लावला होता. दुर्दैवाने हे माझ्या कार्यकाळापूर्वी घडले होते. त्यांना त्यांच्या मोटारसायकली इथे (अमेरिकेत) विकायच्या होत्या आणि आम्ही त्यांच्याकडून कोणताही कर घेत नव्हतो; पण गेल्या काही वर्षांत या व्यापारी संबंधांचे स्वरूप पालटले आहे. आता भारतासमवेतच्या आर्थिक संबंधांमधून अमेरिकेला अधिक लाभ होत असल्याचेही ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी