ट्रम्प यांची इराणला पुन्हा दमदाटी

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीचा करार शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी आता पुन्हा इराणला दमदाटी केली. यावरून ‘ट्रम्प यांनाच हे युद्ध थांबवायची इच्छा नाही’, असे म्हटले जात आहे. ट्रम्प म्हणाले की, जर इराणने अमेरिकी सैनिकांना लक्ष्य केले, तर ते पुन्हा युद्ध चालू करण्याचे एक ठोस आणि सबळ कारण असेल. इराणकडे आता ना नौदल आहे, ना वायूदल. अमेरिकेने इराणच्या नेतृत्वाला पूर्णपणे उद्ध्वस्त केले, असा नेहमीचा दावाही ट्रम्प यांनी केला. ते पुढे म्हणाले की, इराण युद्धात चांगली कामगिरी करत असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. त्याच्याकडे १५९ नौका होत्या. त्या सर्व आज समुद्राच्या तळाशी भंगार म्हणून पडल्या आहेत. आम्ही त्यांची छायाचित्रेही काढली आहेत, असाही दावा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला.
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेच्या संसेदत प्रस्ताव संमत !
अशातच अमेरिकेच्या संसदेने (‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’ने) ट्रम्प यांच्या विरोधात एक प्रस्ताव संमत करून घेतला. यात इराणविरुद्ध युद्ध घोषित करण्याचे ट्रम्प यांचे अधिकार मर्यादित करणे आणि त्यांना सैनिकी कारवाई थांबवण्यास भाग पाडणे यांचा समावेश आहे. विशेष असे की, ‘डेमोक्रॅट्स’च्या या प्रस्तावाला ट्रम्प यांच्या ‘रिपब्लिकन पक्षा’च्या ४ खासदारांनीही पाठिंबा दिला. संसदेच्या या पावलाला ट्रम्प यांनी ‘एक निरर्थक मतदान’ असे संबोधत कडक शब्दांत निंदा केली.
विरोधकांवर आक्रमण चढवतांना ट्रम्प म्हणाले की, डेमोक्रॅट्स ‘ट्रम्प डेरेजमेंट सिंड्रोम’ (ट्रम्प-विरोधाचे वेड) या मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. देशाला प्रगती करतांना पहाण्याऐवजी त्यांना केवळ ट्रम्प यांचा पराभव होतांना पहायचे आहे.
संसदेचा हा निर्णय ट्रम्प यांच्या युद्ध धोरणांविरुद्ध काँग्रेसने दिलेले पहिले यशस्वी आव्हान मानले जात आहे. तथापि हा प्रस्ताव आता ‘सिनेट’मध्ये पाठवला जाणार असला, तरी अंतिम निर्णय घेण्याचे ‘व्हीटो’ अधिकार ट्रम्प यांच्याकडेच आहेत.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !