अटक केलेला जिहादी आतंकवादी शब्बीर याने चौकशीत दिली माहिती

नवी देहली – देहली पोलिसांनी २ दिवसांपूर्वी अटक केलेला लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी शब्बीर अहमद याने चौकशीत मान्य केले की, त्याने देहलीतील प्रसिद्ध कालकाजी मंदिर, लोटस टेंपल आणि छतरपूर मंदिर येथे मोठी आक्रमणे करण्याचा त्याचा कट होता.
रेकीचे (गुप्त पहाणी करण्याचे) व्हिडिओ पाकिस्तानात पाठवले !
शब्बीर अहमद याने या मंदिरांसह कनॉट प्लेसमधील गर्दीच्या बाजारपेठांची रेकी केली होती. त्यानंतर संबंधित ठिकाणांचे व्हिडिओ पाकिस्तानमध्ये बसलेल्या सूत्रधारांकडे पाठवले होते.
चौकशीत असेही समोर आले की, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय. (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) आणि लष्कर-ए-तोयबा काश्मीरमधील ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआर्एफ्) या आतंकवादी संघटनेच्या धर्तीवर बांगलादेशात नवे आतंकवादी जाळे उभे करत आहेत. या योजनेसाठी तेथील मुसलमान तरुणांची भरती केली जात आहे. शब्बीर अहमद काही काळ बांगलादेशात लपून राहिला होता आणि तेथील सत्तांतरानंतर पुन्हा सक्रीय झाला. त्याने देहलीपासून दक्षिण भारत आणि बंगाल येथपर्यंत त्याचे जाळे विस्तारले होते.
कारागृहातून सुटल्यावर पुन्हा आतंकवादी कारवाया
शब्बीर अहमद याचा संबंध टीआर्एफ् कमांडर सज्जाद गुल याच्याशी असल्याचे समोर आले आहे. गुलवर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मोठे बक्षीस घोषित केले आहे. वर्ष २०१५ मध्ये काश्मीरमध्ये दोघांना एकत्र पकडण्यात आले होते. कारागृहातून सुटल्यानंतर सज्जाद पाकिस्तानात पळून गेला. त्याने पाकव्याप्त काश्मीरमधून कारवाया चालू केल्या, तर शब्बीरला भारतात आक्रमणांसाठी सिद्ध करण्यात आले. (यातून स्पष्ट होते की, आतंकवाद्यांना पोसत रहाण्यापेक्षा त्यांना पकडल्यानंतर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा देणे किती योग्य आहे ! आताही शब्बीर याला फाशी होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !