इराणच्या भूमीवर कारवाई करण्याची सिद्धता

नवी देहली – अमेरिकेकडून इराणमध्ये आता सैनिक उतरवून त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अमेरिकेच्या नौदलाचे ३ सहस्र ५०० कमांडो ‘यू.एस्.एस्. त्रिपोली’ युद्धनौकेद्वारे येथे पोचले आहेत. त्यांच्यासमवेत मोठ्या संख्येने लढाऊ विमाने आणि शस्त्रेही पाठवण्यात आली आहेत.
🚨 3,500 U.S. Navy commandos deployed to Gulf nations – reports suggest preparations for possible operations linked to Iran.
Preparations underway for action on Iranian soil
"This army will return from Iranian soil in coffins!" – Tehran Times
Just as Islamic thugs invaded… pic.twitter.com/GXho0a9HQs
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 29, 2026
‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने वृत्त दिले आहे की, अमेरिका इराणमध्ये एका भू-अभियानाची सिद्धता करत आहे, जे अनेक आठवडे चालू शकते. हे अभियान मोठ्या प्रमाणावर नसेल. यामध्ये विशेष दलांच्या धाडी आणि पायदळाच्या कारवाया यांचा समावेश असू शकतो.
हे सैन्य इराणी भूमीवरून शवपेट्यांमध्ये परत जाईल ! – ‘तेहरान टाईम्स’

इराणचे इंग्रजी वृत्तपत्र ‘तेहरान टाईम्स’ने अमेरिकी सैन्याच्या तैनातीवर वृत्त देतांना ‘नरकात आपले स्वागत आहे’, असा मथळा देत ‘हे सैन्य इराणी भूमीवरून शवपेट्यांमध्ये परत जाईल’, असे म्हटले आहे.
अमेरिका आणि इस्रायल यांना पाठिंबा देऊ नका ! – इराणच्या राष्ट्राध्यक्षांची चेतावणी

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी आखाती देशांना कोणत्याही सैनिकी कारवाईत अमेरिका आणि इस्रायल यांना पाठिंबा न देण्याची चेतावणी दिली. ते म्हणाले की, आम्ही अनेकदा सांगितले आहे की, इराण प्रथम आक्रमण करत नाही; परंतु जर आमच्या पायाभूत सुविधांवर किंवा आर्थिक केंद्रांवर आक्रमण झाले, तर आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ. जर या देशांना प्रदेशात स्थिरता आणि विकास हवा असेल, तर त्यांनी इराणवर आक्रमणे करण्यासाठी त्यांच्या भूभागाचा वापर होऊ देऊ नये.
पाकिस्तानमध्ये झाली ३ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक
पाकिस्तानमध्ये २९ मार्च या दिवशी तुर्कीये, इजिप्त आणि सौदी अरेबिया यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत आखाती देशांतील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत काय ठरले, हे समजू शकले नाही.
हुती आतंकवाद्यांंकडून इस्रायलवर दुसरे मोठे आक्रमण
येमेनमधील हुती आतंकवाद्यांनी इस्रायलवर दुसर्यांदा क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांद्वारे आक्रमण केले. ‘जोपर्यंत इस्रायल त्याच्या कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत ही आक्रमणे चालूच रहातील’, असे त्यांनी म्हटले आहे.
‘दलाल’ पाकिस्तानवर इराणची कृपा : २० पाकिस्तानी नौकांना हॉर्मुझमधून जाण्याची दिली अनुमती
‘दलाल’ पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी सांगितले की, इराणने पाकिस्तानी ध्वज असलेल्या २० नौकांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची अनुमती दिली आहे. करारानुसार प्रतिदिन २ नौका या सामुद्रधुनीतून ये-जा करतील. काही दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी पाक युद्धात मध्यस्थी करत असल्यावरून त्याच्यावर ‘दलाल’ अशी उपरोधिक टीका केली होती.
संपादकीय भूमिकामध्ययुगात ज्याप्रकारे इस्लामी गुंड अन्य साम्राज्यांवर आक्रमणे करून तेथे नरसंहार करत, त्याप्रकारे गेल्या दशकभरात इस्लामिक स्टेट आदी आतंकवादी संघटना करत आल्या. तसेच मध्ययुगीन घडामोडींच्या अंतर्गत ज्या प्रकारे एक साम्राज्य दुसर्यावर साम्राज्यावर आक्रमण करून त्यावर नियंत्रण मिळवायचे, तसे आता अमेरिका करू पहात आहे, हेही आता म्हणायला हरकत नाही ! |
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला