पहलगाम आणि पुलवामा येथील आक्रमणांविषयी मौन बाळगणारे काश्मीरमधील मुसलमान इराणसाठी पैसे का देत आहेत ? – T Raja Singh

  • भाग्यनगर (तेलंगाणा) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांचा प्रश्न

  • काश्मीरमधून ५०० कोटी रुपये इराणला पाठवण्याची योजना

भाग्यनगर (तेलंगाणा) – जेव्हा पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी आमच्या पर्यटकांचा धर्म पाहून त्यांची हत्या केली होती, तेव्हा तुम्ही लोक (काश्मिरी मुसलमान) कुठे होतात ? त्यांच्यासाठी तुम्ही किती देणगी दिली होती ? जेव्हा आतंकवाद्यांनी पुलवामामध्ये सैनिकांची हत्या केली होती, तेव्हा तुम्ही सैनिकांच्या कुटुंबियांच्या साहाय्यासाठी बाहेर पडला नव्हतात. ते तर आपल्याच देशाचे सैनिक आणि नागरिक होते. मग आता जेव्हा एका दुसर्‍या देशात कुण्या तिसर्‍या देशाने आक्रमण केले आणि तिथल्या सर्वोच्च धार्मिक नेत्याची हत्या केली, तर भारतात लोक का शोक व्यक्त करत आहेत ?, असा संतप्त प्रश्न येथील गोशामहल मतदारसंघाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी विचारला. काश्मीरमधील मुसलमान इराणसाठी देणगी आणि साहाय्य देत असल्यावरून त्यांनी हा प्रश्न विचारला.

टी. राजासिंह पुढे म्हणाले की,

१. इराणवर अमेरिका आणि इस्रायल यांनी आक्रमण केले अन् तेथील सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांना ७२ हूर (अप्सरा) यांच्याजवळ पोचवले. आक्रमण इराणमध्ये झाले आणि आक्रमण करणारा देश दुसराच आहे, तरीही शोक आपल्या देशात का केला जात आहे ?

२. काश्मीरमध्ये काही असेही मुसलमान आहेत, जे ५०० कोटी रुपये जमा करून इराणला पाठवण्याची योजना आखत आहेत.

३. आमचे भारताचे वीर सैन्य आमचे रक्षण करते. आतंकवादी आक्रमणे होतात, या आक्रमणांमध्ये आमच्या सैन्याचे वीर सैनिक हुतात्मा होतात, तेव्हा तुमचे हे दुःख कुठे जाते ?, हे मी काश्मीरच्या मुसलमानांना विचारू इच्छितो.

संपादकीय भूमिका

असा प्रश्न केवळ टी. राजासिंह हे एकमेव आमदार विचारत आहेत, अन्य का गप्प आहेत ? त्यांना काश्मिरी मुसलमानांनी हिंदूंना साहाय्य करण्याऐवजी इराणला पैसे पाठवणे मान्य आहे, असे समजायचे का ?